रायगड

किल्ले रायगडावर ३४८ वा शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा

अनुराधा कोरवी

रायगड; पुढारी वृत्तसेवा : किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३४८ वा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहाने पार पडला. यावेळी किल्ले रायगडावर येणाऱ्या शिवभक्तांची संख्या लाखोंच्या घरात होती. यामुळे प्रचंड मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

यात गडावरील बंदोबस्त दोन उपविभागीय पोलीस अधिकारी, सात पोलीस निरीक्षक, १० सहाय्यक पोलीस निरीक्षक, नऊ पोलीस उपनिरीक्षक, १७३ अंमलदार, १०६ होमगार्ड, एक आरसीपी पथक, एक एसआरपी पथक आणि १६ वॉकीटॉकी तर गडाखाली एक उपविभागीय पोलीस अधिकारी, चार पोलीस निरीक्षक, ८ सहाय्यक पोलीस निरीक्षक, ७ पोलीस उपनिरीक्षक, १४२ अंमलदार, ९० होमगार्ड, एक आरसीपी पथक, दोन एसआरपीएफ पथक आणि १२ वॉकीटॉकी पोलिंसाचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

रोड व पार्किंग बंदोबस्तासाठी एक उपविभागीय पोलीस अधिकारी, १० पोलीस निरीक्षक, ८ सहाय्यक पोलीस निरीक्षक, १२ पोलीस उपनिरीक्षक, १५९ अंमलदार, १२७ वाहतूक पोलीस, ७५ होमगार्ड, २१ वॉकीटॉकी पोलीस, राखीव पोलीस बंदोबस्त दोन पोलीस निरीक्षक, एक सहाय्यक पोलीस निरीक्षक, सहा पोलीस उपनिरीक्षक, १७७ अंमलदार, सहा वाहतूक पोलीस असा बंदोबस्त जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांच्या मार्गदर्शनाखाली तैनात करण्यात आला आहे.

सोमवारी सकाळी १०.१० वाजता छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांना अभिषेक, सकाळी १०.२० वा. मेघाडंबरीतील छत्रपती शिवाजी महाराजांना सुवर्ण नाण्यांचा अभिषेक, सकाळी १०.३० वा. छत्रपती संभाजीराजे यांचे मार्गदर्शन, सकाळी ११.00 वा. 'सोहोळा पालखीचा, स्वराज्याच्या ऐक्याचा` शिवराज्याभिषेक मुख्य पालखी सोहळा, दु. १२ वा. जगदीश्वराचे दर्शन घेऊन पालखी सोहळ्याचा समारोप आणि त्यानंतर छत्रपती संभाजीराजे यांचे समाधीस अभिवादन असा कार्यक्रम आयोजित केला होता.

या सोहळ्यानिमित्त शिवराज्याभिषेकाच्या मुख्य कार्यक्रसोबत ' धार तलवारीची, युध्दकला महाराष्ट्राची, 'जागर शिवशाहिरांचा, स्वराज्याच्या इतिहासाचा` आणि 'सोहोळा पालखीचा, स्वराज्याच्या ऐक्याचा` असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

हेही वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT