दापोलीतील रिसॉर्ट हे अनिल परब यांच्याच मालकीचे : किरीट सोमय्या | पुढारी

दापोलीतील रिसॉर्ट हे अनिल परब यांच्याच मालकीचे : किरीट सोमय्या

पुढारी ऑनलाईन : सदानंद कदम यांच्या पत्रानुसार दापोलीतील रिसॉर्ट हे अनिल परब यांच्या मालक[चे असल्याचा  दावा पुन्‍हा एकदा भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला. याप्रकरणी त्‍यांनी अआज पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांची भेट घेतली.

माध्‍यमांशी बाेलताना साेमय्‍या म्‍हणाले की, राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांच्या निवासस्थानासह त्यांच्याशी संबंधित सात ठिकाणी ईडीने छापा मारला होता. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील रिसॉर्टच्या खरेदी-विक्रीत गैरव्यवहार झाल्याप्रकरणी अनिल परब यांची चौकशी केली होती.

ईडीच्या कारवाईनंतर या रिसॉर्टशी माझा संबंध नसून रिसॉर्टचे मालक मुंबईतील केबल ऑपरेटर सदानंद कदम आहेत. ते रिसॉर्ट अजून सुरू झालेले नाही, असा दावा अनिल परब यांनी केला होता. याप्रकरणी किरीट सोमय्या यांनी आज पोलिस महासंचालकांची भेट घेतली. त्यानंतर सोमय्या यांनी सदानंद कदम यांच्या पत्राचे वाचन प्रसारमाध्यमांसमोर केले. दापोलीतील रिसॉर्ट हे अनिल परब यांच्याच मालकीचे असल्याचा दावा त्यांनी केला.

हेही वाचलंत का?

Back to top button