Firing Pudhari
रायगड

Taloja firing incident: तळोजात लिफ्ट कंत्राटावरून गोळीबार; दोघे गंभीर

लोखंडी रॉड, बांबूने मारहाणीनंतर पिस्तूलातून गोळ्या

पुढारी वृत्तसेवा

पनवेल: लिफ्ट देखभाल-दुरुस्तीचे कंत्राट आणि जुन्या आर्थिक व्यवहारांवरून झालेल्या वादातून तळोजा फेज-२ मधील शिवाजी चौक परिसरात गोळीबाराची घटना घडली. यावेळी लोखंडी रॉड आणि लाकडी बांबूने तिघांना मारहाण केल्यानंतर पिस्तूलातून गोळ्या झाडण्यात आल्या. या घटनेत विशाल शिंदे आणि सचिन डांगे हे दोघे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्ती यापूर्वी भागीदारीत लिफ्ट देखभाल-दुरुस्तीची कंत्राटे घेत होत्या. मात्र, जुन्या आर्थिक व्यवहारांवरून मतभेद झाल्यानंतर त्यांनी वेगळे काम सुरू केले.

त्यानंतर कंत्राट मिळवण्यावरून त्यांच्यात वाद सुरू होता. मध्यरात्री विशाल शिंदे, सचिन डांगे आणि सौरभ डुंबरे हे तळोजा फेज-२ मधील शिवाजी चौकाजवळील मारवा इमारतीखाली उभे असताना आरोपींशी त्यांचा वाद झाला.

या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले आणि त्यानंतर गोळीबार करण्यात आला. या प्रकरणी तळोजा पोलिसांनी सागर डांगे, आकाश डांगे, गणेश लावरे, अनिकेत नरवाडे, रुद्र बारवकर यांच्यासह अन्य तीन अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. फरार आरोपींचा शोध सुरू असून, तळोजा पोलीस पुढील तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT