संध्या पिंगळे
तळा: गणेशोत्सवाला अवघा महिनाभराचा कालावधी उरला आहे.त्यामुळे सध्या तालुक्यातील सर्वच चित्रशाळांमध्ये गणेशमूर्तींना रंगकाम करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झालेले आहे.आकर्षक रंगसजावटीने बाप्पांचे रुपही खुलू लागल्याने गणेशमूर्तीकारांचे चेहरे आनंदाने फुलले आहेत.
तळा शहातील शिंदे चित्र शिल्पालयातील गणेशमूर्तीना मागणी वाढली आहे. यावर्षीच्या मागणीत वाढ झाली आहे. मात्र शाडूचीमाती, प्लास्टर ऑफ पॅरिस, रंगाचे भाव अंदाजे ३०% ने वाढल्याने मूर्तींच्या किंमतीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
त्यातच शिल्पकारानी मे पासून तळा तालुक्यात मूर्ती तयार करण्यास सुरुवात केली आहे. आजपर्यत या चित्रशिल्पालयात अंदाजे ६०० गणेशमूर्ती घडवल्या आहेत. रंगकाम करण्यास आता सुरुवात केली आहे. या गणेशमूर्ती तालुक्यासह माणगाव, रोहा, मुरूड, म्हसळा इत्यादी ठिकाणी जातात.
जूनपासून मूर्ती तयार करण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच गणेश भक्त सांगेल त्याप्रकारची मूर्ती तयार करून द्यावी लागते. एकूण दहा पंधरा कलाकार दोन तीन महिने येथे काम करत आहेत.
येथून पुणे, खेड, रत्नागिरी, मुंबई, महाड, निजामपूर, अलिबाग, जोगेश्वरी, इंदापूर, म्हसळा, रोहा इत्यादी ठिकाणी गणेशमूर्ती जात असतात. उत्तम पेंन्टर, उत्तम मूर्तीकार म्हणून प्रसिद्ध आहेत. तसेच त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांचा मुलगा आकाश शिंदे हा देखील या क्षेत्रातील एक तज्ञ कारागिर म्हणून महाराष्ट्रात त्याची ओळख झाली आहे. स्वतः चांगल्या प्रकारच्या गणेशमूर्ती सतिश शिंदे हे घडवत आहेत. श्रीगणेश मुर्तीच्या रंगकामास सुरूवात झाली आहे.
कोकणवासीयांचा हा सर्वांचा मोठा सण असून गावोगावी चाकरमानी न चुकता या गणेश उत्सवानिमित्त येत असतात व मोठ्या प्रमाणावर हा उत्सव साजरा होत असतो.
शिंदे चित्र शिल्पालय कारखान्यास सन २००० मध्ये सुरूवात केली. सुरूवात करण्यापूर्वी इतर ठिकाणी रंगकाम व मूर्ती स्वतः हाताने घडवत होतो. नंतर स्वतःचा स्वतंत्र असं शिल्पालय असावं व त्यासाठी सर्वांनी मला मार्गदर्शन केले व काम सुरू केले.सुरूवातीला काही ठराविक मूर्ती तयार केल्या.गणेश भक्तांना मूर्ती आवडल्या आणि मागणीत वाढ होऊन आजच्या स्थितीत ६०० मुर्तीची मागणी आहे. यावर्षी रंग, शाडूचीमाती, व इतर साहित्याच्या किंमती वाढल्याने गणेशमूर्तीच्याही किंमतीत वाढ झाली आहे.- सतिश हरिश्चंद्र शिंदे, गणेशमूर्तीकार