Sudhagad Terda flowers pudhari photo
रायगड

Sudhagad Terda flowers : सुधागडात रानोमाळ बहरली तेरड्याची आकर्षक फुले

गणपती बरोबर येणाऱ्या गौरी मातेला विशेष करून ही फुले अर्पण केली जातात.

पुढारी वृत्तसेवा

सुधागड : संतोष उतेकर

सर्वत्र माळरान, डोंगर उतार व शेताच्या बांधावर आकर्षक तेरड्याची फुले फुलली आहेत. जांभळट, फिकट गुलाबी, तांबडे किंवा पांढरे अशा विविध आकर्षक रंगांची ही फुले सगळ्यांचेच लक्ष वेधत आहेत. गणपती बरोबर येणाऱ्या गौरी मातेला विशेष करून ही फुले अर्पण केली जातात. त्यामुळे या झाडाला गौरी किंवा गौरीची फुले किंवा गुल मेह्न्दी असे म्हटले जाते.

येणाऱ्या जाणाऱ्यांची ही आकर्षक रंगीबेरंगी फुले लक्ष वेधून घेतात. विस्तृत बहरलेली ही मनमोहक फुले मन प्रसन्न करतात. फुलांचा वापर गणपतीमध्ये माटोळीसाठी देखील केला जातो. चातुर्मासात तेरड्याचे महत्व पूजेसाठी असते. गौरीच्या पुजेत तसेच पिठवरीच्या पुजेतही तेरडा हा लागतोच. पिठोरी अमावस्येला ''पात्री'' म्हणून तेरडा आणावा लागतो. गौरी गणपतीच्या सणाला पूजेकरिता तेरड्याची पाने फुले वाहतात.

पाना-फुलांचा औषधी उपयोग

तेरडा हा पित्तशामक असून त्याची फुले पौष्टिक आणि थंड असतात. फिलिपिन्समध्ये फुलांचा उपयोग कंबर दुखीसाठी केला जातो. फुलांमध्ये काही अँटीबायोटिक सारखे गुण सापडले आहेत ज्यामुळे काही बॅक्टेरिया आणि फंगस नष्ट होतात. काही देशांत मेंदीप्रमाणे तेरड्याच्या पानांनी व फुलांनी हात व नखे रंगवितात. फुले थंडावा देणारी असून ती भाजलेल्या जागी लावतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT