Smart Meter Protest Pudhari
रायगड

Smart Meter Protest: कर्जत तालुक्यात स्मार्ट मीटरची सक्ती; ममदापूर येथे नागरिकांचा विरोध

स्मार्ट मीटर विरोधात कर्जत संघर्ष समितीच्या माध्यमातून अंदोलने उपोषण करण्यात आली आहेत.

पुढारी वृत्तसेवा

नेरळ: स्मार्ट मीटर बसविण्यासाठी ठेकाप्राप्त कंपन्यांकडून केंद्र शासनाच्या अद्यादेशाचा दबाव वाढत चालला असून, ग्राहकांना नोटिसांची भीती दाखविली जात आहे.या पार्श्वभूमीवर ममदापूरमध्ये गोकुळधाम सोसायटीमधील बेकायदेशीर स्मार्ट मीटर बसविण्यास नागरीकांचा विरोध दर्शविला आहे.

स्मार्ट मीटर विरोधात कर्जत संघर्ष समितीच्या माध्यमातून अंदोलने उपोषण करण्यात आली आहेत. या संदर्भात वारंवार महावितरण विभागाला निवेदन देखील देण्यात आले आहेत. तालुक्यामधून या स्मार्ट मीटरांना वीजग्राहकांकडून कडाडून विरोध होत आहे. तरी देखील हे स्मार्ट मीटर बसवण्यासाठी ठेका देण्यात आलेल्या कंपन्याकडून ग्राहकांवर सक्तीकरून हे स्मार्ट मीटर बसविण्याचे व त्याला नागरीकांकडून होणारा विरोधाभासाचे प्रकार समोर येत आहेत.

ममदापूर ग्रामपंचायत हद्दीतील गोकुळधाम सोसायटी मध्ये असाच प्रकार समोर आला आहे. ठेका प्राप्त कंपनीच्या माणसांकडून गोकुळधाम सोसायटीमध्ये स्मार्ट मीटर हे शनिवारी (4 एप्रिल) बसविण्यास सुरवात करण्यात आली होती. हा प्रकार तेथील रहिवाशांच्या लक्षात येताच ठेका प्राप्त कंपनीच्या माणसांना जाब विचारला.

आम्ही सोसायटीच्या कमेटीला शासनाचा जीआर तसेच नोटीस दिल्याचे सांगण्यात आले. त्यावेळी रहिवाशांनी तसा जीआर व नोटीस ही आम्हा सोसायटी धारकांना प्राप्त झाला नसल्याचे सांगीतले. तो जीआर दाखविण्याची मागणी केली असता.

कंपनींच्या माणसांकडून केंद्र शासनाचा 2 जून 2023 च्या जीआरची प्रत दाखविली. तसेच ही महावितरणाची प्रॉपर्टी आहे. तुम्हाला विरोध करता येणार नाही. व आम्ही तुम्हाला नोटीस बजावू 24 तासात नोटीसीचे उत्तर द्या, अशी भीती दाखवत सक्तीने मीटर बसवण्याचे काम सुरू ठेवले होते.

कर्जत संघर्ष समितीचे ॲड. कैलास मोरे यांना फोन करून या ठेकाप्राप्त कंपनीचे माणसासोबत बोलणे करून दिले असता त्यांच्याशीही या कर्मचाऱ्यांनी हुज्जत घातली. महावितरणचे पेण येथील अधिकारी यांच्याशी फोनवरून संपर्क साधून त्यांच्याशी बोलणे करून दिले असताना देखील कामसुरू ठेवले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT