

महाड: महाड एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील खरेदी गावात एक एप्रिल पासून मी पत्ता झालेल्या सुरज धोत्रे याचा मृतदेह वरंधा घाटात सापडल्याने एकच खळबळ उडाली असून हा अपघात की घातपात अशा चर्चेला उधाण आले आहे.
महाड एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील खरवली येथील रहिवाशी सुरज धोत्रे हा 1 एप्रिल पासून बेपत्ता होता. या संदर्भात सुरज याची पत्नी हिने महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात आपला पती हरवल्याची तक्रार शुक्रवारी (3 एप्रिल ) दाखल केली होती.
पोलीस बेपत्ता झालेल्या सुरज धोत्रेचा शोध घेत असतानाच भोरला जातो असे सांगून सुरज हा होंडा शाईन कंपनीची मोटरसायकल घेऊन घरातून निघून गेला होता मात्र आज सकाळच्या सुमारास सुरज याचा मृत्यूदेह वरंध गावच्या हद्दीत सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात सदरच्या मृत्यूची आकस्मित मृत्यू अशी नोंद करण्यात आली असून घटनास्थळीच सदरच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. घटनास्थळी पोलीस प्रशासन व फॉरेन्सिक टीम दाखल झाली असून एमआयडीसी पोलीस सदरच्या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.
मृतदेह कुजलेल्या स्थितीत
बेपत्ता झालेल्या सुरजचा मृत्यू देह अचानक रस्त्याच्या शेजारी कुजलेल्या सापडल्याने उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. सुरज धोत्रे याचा अपघात झाला की घातपात याचा शोध पोलीस घेत असून सदरचा मृतदेह तीन दिवसापासून कुजलेल्या अवस्थेत गावकऱ्यांना आढळून आला आहे.