खोपोली : खालापूर तालुक्यातील सावरोली गावच्या वेशीवर असणारी शंकर मंदिराच्या बाजूला गजलक्ष्मी मातेचे स्थान असून ही गजलक्ष्मी माता सावरोली गावच्या प्रत्येक नागरिकांनी रक्षण करणारी व भरभराट करणारी देवी म्हणून परिचित आहे.
बाजूला घनदाट झाडी असल्याने यापूर्वी या ठिकाणाहून ये जा करताना मनात भीती असायची. मात्र गजलक्ष्मी मातेचे धावा केल्यानंतर या ठिकाणाहून कोणतीही भीती मनात न येता सुखरूपपणे गावात प्रवेश होतो, अशी महती आजही नागरिक सांगत असतात त्यामुळे येथील नागरिकांची गजलक्ष्मी मातेवर नितांत श्रद्धा आहे.
सावरोली गावात पूर्वी वाहने कमी असल्याने पायी किंवा सायकल वरून कामगार वर्गाचा जास्त प्रवास करणारे नागरिक दिवसा किंवा रात्री ये जा असायची त्यामुळे या घनदाट झाडी असल्याने या ठिकाणाहून प्रवास म्हणजे पूर्वी मनात भीतीदायकच होते. मात्र येथून प्रवास करणार्या प्रत्येकाला सुखरूप पोहचविणारी गजलक्ष्मी माता म्हणून प्रत्येकाच्या मनात धारणा आजही आहे. या गजलक्ष्मी मातेचे एका आंब्याच्या झाडाखाली स्थान होते.
गावातील नागरिक मात्र या गजलक्ष्मी मातेला नतमस्तक झाल्याशिवाय पुढे जात नाहीत. या गजलक्ष्मी मातेचा अनेकांना साक्षात्कार झाल्याची प्रचितीही आहे. नागरिकांची इच्छा पूर्ण करणारी, नवसाला पावणारी गजलक्ष्मी माता म्हणून नागरिकांच्या मनात या स्थानाबद्दल धारणा आहे. सावरोली गावचे माजी सरपंच स्वर्गीय प्रदीप शिरीष लाड यांची या गजलक्ष्मी मातेचा जीर्णोद्धार व्हावा अशी भावना मनात झाल्याने त्यांनी जवळपास 18 वर्षांपूर्वी सावरोलीचे पोलीस पाटील काही ग्रामस्थांच्या ही इच्छा कानावर घातली आणि सर्व ग्रामस्थांनी सढळ हस्ते यथाशक्ती मदत करून छोटेशे मंदिर उभे करून ऊन पावसापासून रक्षण होईल अशा उद्देशाने मंदिर उभे करून या ठिकाणी प्रत्येक सावरोलीतील नागरिक येता जाता सहजपणे नजरेस पडणार्या गजलक्ष्मी मातेला वंदन करून पुढचा प्रवास करीत असतो. तर दर गुरुवारी या ठिकाणी दर्शनासाठी विशेष पूजेसाठी गर्दी असते.
या ठिकाणी स्वर्गीय प्रदीप लाड यांचे कुटुंब व मित्र परिवार आजही वर्षातून एकदा सत्यनारायणाची पूजा यासह नवरात्र उत्सवात घटस्थाना करून नऊ दिवस या गजलक्ष्मी मातेचा धावा करीत असतात. तर दिवाळी सणात लक्ष्मी पूजनाला या ठिकाणी पूजाअर्चा करून दिवे लावून येथील परिसर प्रकाशमय केला जातो. दसर्या दिवशी नव्या धान्याचा सोने लुटून आल्यावर या देवीच्या चरणी अर्पण करूनच घरी जात असतात.
या नवसाला पावणार्या गजलक्ष्मी मातेला पूजाअर्चा अभिषेक यासह नवरात्र उत्सवात महिला खणा नारळाची ओटी भरण्यासाठी गर्दी करीत असतात, त्यामुळे सावरोली तील नागरिकांचा रक्षण करणार्या गजलक्ष्मी मातेवर नितांत श्रद्धा आहे. या गजलक्ष्मीचे स्थान वेगळी ऊर्जा देणारी आहे अशी भावना प्रत्येकाच्या मनात आहे आताच्या घडीला या ठिकाणच्या प्रवास भीतीमुक्त झाल्याचे प्रत्येकाला जाणवत आहे.
मातेला नतमस्तक होऊन ग्रामस्थांचा प्रवास
सावरोली गावात पूर्वी वाहने कमी असल्याने पायी किंवा सायकल वरून कामगार वर्गाचा जास्त प्रवास करणारे नागरिक दिवसा किंवा रात्री ये जा असायची त्यामुळे या घनदाट झाडी असल्याने या ठिकाणाहून प्रवास म्हणजे पूर्वी मनात भीतीदायकच होते. मात्र येथून प्रवास करणार्या प्रत्येकाला सुखरूप पोहचविणारी गजलक्ष्मी माता म्हणून प्रत्येकाच्या मनात धारणा आजही आहे. या गजलक्ष्मी मातेचे एका आंब्याच्या झाडाखाली स्थान होते. गावातील नागरिक मात्र या गजलक्ष्मी मातेला नतमस्तक झाल्याशिवाय पुढे जात नाहीत.