Somjai Mata Mahad : महाडच्या ऐतिहासिक गावातील गावदेवी ‘सोमजाई माता’

गावावर देवदेवतांचा सतत वरदहस्त; महापुरुषांच्या सांडलेल्या रक्ताने पुनीत झालेली इथली भूमी
Somjai Mata Mahad
महाडच्या ऐतिहासिक गावातील गावदेवी ‘सोमजाई माता’pudhari photo
Published on
Updated on

महाड ः श्रीकृष्ण द. बाळ

सावित्रीच्या तिरावर बसलेले अतिसुंदर गांव म्हणजे महाड गांधारी व सावित्रीच्या जलस्पर्शनेच महाडात प्रवेश करावा लागतो. पूर्वेकडून आल्यास माता सावित्री आपणास गांवापर्यंत सोबत करत असते महाड हे ऐतिहासिक गांव म्हणून जरी प्रसिद्ध असले तरी गावावर देवदेवतांचा सतत वरदहस्त असतो. इथली भूमी महापुरुषांच्या सांडलेल्या रक्ताने पुनीत झालेली भूमी भाग्यशालीच म्हणावी लागेल.

या महाड गावात प्रवेश करणे म्हणजे जणूकाही मंदिर प्रवेशच होय. इथली दैवते फारच प्रखर आणि नवसाला पावणारी म्हणून आहेत या सर्व देवदेवतांचा गांवावर सदैव जागता पहारा असतो. गावाता शिरण्यापूर्वीच पूर्वेला आई माता देवी सोमजाईचे भव्य मंदिर लागते. महेंद्र गडाच्या पायथ्याशी सह्याद्रीच्या मांडीवर बसून माता सोमजाई सार्‍या भक्तांचे सदैव रक्षण करत असते गावाला सुख शांती वैभव प्राप्त व्हावी म्हणून नवे नगरचा मारुतीराया श्रीरामाला साखरे घालत युगेन युगे उभेच आहेत. पश्चिमेस आई जाखमाता उत्तरेस कोटेश्वरी प्रेमाची उधळीत करत असतात या महाड नगरीतील भाविक श्रद्धाळू आहेतच गावाचे विश्व असणार्‍या माता समजायची पार्थना भाविक भक्तिभावाने करत असतात.

गावदेवीचे देऊळ पूर्वी फारच छान असे होते. सुविधांचे अभाव होते पण देवीच्या परिसरात राहणार्‍या भक्तांनी दानशुर मंडळींनी देवळाला आगळी वेगळी शोभा आणली आहे. धार्मिक विधी आलेल्या पाहुणे मंडळींची उठबस व्हावी म्हणून लोकांनी एक सुंदर भव्य असा सभामंडप देवीच्या समोर घातला आहे. येथेच सारे सण उत्सव साजरे होत असतात. एकांतपणा सुस्वच्छ परिसर आणि माता देवीचे सतत लाभणारे अभय यामुळे भाविक क्षणभर सर्वभान हरपून जातो. दर महा देवीचे उत्सव साजरे होत असतात. देवीला सोडोपचारे पुजा गंध धुपदिप लावला जातो देवीचे पुजारी ही सेवा भक्ती भावाने करतच असतात. परिसरांतील लोकांनी या गाव देवीचे वैभव दिवसेंदिवस कसे वाढेल या गोष्टीवर संपूर्ण ध्यान दिले आहे. ना राजकारण ना लहानमोठेपणा सर्व भक्त समान या न्यायाने इथे मंडळी येत असतात.

Somjai Mata Mahad
Waghjai Devi Kumbhale : भाविकांच्या नवसाला पावणारी कुंभळे गावची वाघजाई देवी

गोकुळआष्टमी, नवरात्र, होळी उत्सव इत्यादी सण येथे मोठ्या भक्ती भावाने होत असतात. या आनंददायी परिसरात अनेक संस्था आपले कार्यक्रम साजरे करत असतात. एक जागृत देवस्थान म्हणून सार्‍या पंचक्रोशीत या देवीचा लौकिक आहे. फार पूर्वीच्या कागदपत्रावरुन देवीची जत्रा साजरी होत असल्याचा उल्लेख सापडतो. पूर्वी वतनदार मंडळीच देवीची व्यवस्था पहात असत पण हल्ली परिसरांतील भक्तांनी विशेष लक्ष पुरविल्यामुळे देवीचे महात्म्य व वैभव यात वृद्धी झालेली आपणास पहावयास मिळते.

Somjai Mata Mahad
Mahad Jakhamata Devi temple : महाड शहराची ग्रामदेवता देवी जाखमाता भाविकांचे श्रद्धास्थान

अबाल-वृद्धांचे आरोग्य जपणारी महाडकराची माता-जननी

शिवपत्नी पार्वती म्हणजेच आदी शक्ती कालीमाता भवानी अंबा- जगदंबा, महालक्ष्मी अशीच तिची विविध रुपे आहेत. या रुपांतुनच समाजव्यवस्थाबाबत असणार्‍या वाईट गोष्टीचा या देवता नाश करत असतात. वातावरण आनंदी व प्रसन्न असते. निसर्ग फळाफुलांनी भरलेला असतो. पशुपक्षी सारे सुख समाधानात असतात. सृष्टी धन्यधान्यांनी भरलेली असते आणि हे सारे मंगलमय करणारी देवता अनेक रुपात वावणारी देवी आदी माया हीचे लोक पूजन करतात. अश्विनशुद्ध प्रतिपदा ते अश्विनशुद्ध नवमी पर्यंत नऊ दिवस देवीची सोडपचारे पुजा करतात. रात्रभर देवीपुढे फेर धरून नाचतात तिला जागवतात व आपण स्वतः आनंद उत्सवात सहभागी होतात.

सारी शहरवासीय मंडळी नित्यनियमाने देवी जवळ येतात. नवस बोलतात तेथील भक्तगण आल्या गेल्याचे मनोभावे स्वागत करतात. देवीचा पुजारी देवीसमोर गार्‍हाणे मांडतो आणि सामान्य माणसाच्या सुखासाठी देवीला साकडे घालत असतो. हे सारं पहातांना डोळे पाणवतात. अशी ही महाडची सोमजाई गावांच्या वेशीवर राहून जागता पहारा देणारी अबाल वृद्धांचे आयूआरोग्य जपणारी महाडकराची माता जननी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news