मुंबईतील तरूणीचा इन्स्टाग्रामसाठी रील करताना दरीत पडून मृत्यू झाला.  Reel Star Aanvi Kamdar
रायगड

Reel Star Aanvi Kamdar : रीलच्या नादात दरीत पडून रील स्टार अन्वी कामदारचा मृत्यू

रायगडमधील कुंभे धबधबा येथील घटना

Shambhuraj Pachindre

पुढारी ऑनलाईन डेस्क | Reel Star Aanvi Kamdar : मुंबईतील तरूणीचा इन्स्टाग्रामसाठी रील करताना दरीत पडून मृत्यू झाला. ही घटना रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील कुंभे धबधबा येथे घडली. अन्वी कामदार असे या रील स्टार तरूणीचे नाव आहे. व्यवसायाने ती सनदी लेखपाल आहे. सोशल मीडियावर रील स्टार म्हणून तिने स्वत:ची ओळख निर्माण केली होती.

रील स्टार अन्वी आणि तिचे सात सहकारी माणगाव तालुक्यातील कुंभे येथे वर्षा पर्यटनासाठी गेले होते. यावेळी सोशल मीडिया प्लॅटफार्म इन्टाग्रामसाठी व्हिडिओ बनवण्यासाठी अन्वी एका कठड्यावर उभारून व्हिडिओ बनवत होती. यावेळी कठड्यावरून तोल गेल्यामुळे ती सुमारे 300 फूट दरीत कोसळली. या घटनेची माहिती अन्वीच्या सहकाऱ्यांनी माणगाव पोलीस ठाण्यात कळवली. ही माहिती समजताच माणगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत त्यांनी स्थानिक बचाव पथकांना पाचारण केले. मात्र दरी खोल असल्याने बचावकार्यात अडचणी आल्या.

यानंतर घटनास्थळी कोलाड, माणगाव, महाड येथून प्रशिक्षित बचाव पथकांना पाचारण करण्यात आले. दोरीचा आधार घेत ही बचाव पथके दरीत उतरली. यावेळी अन्वी गंभीर जखमी अवस्थेत बचाव पथकाली दिसली. यावेळी बचाव पथकांनी तिला स्ट्रेचरच्या साह्याने दोरीचा आधार घेत तिला दरीतून बाहेर काढले. मात्र, माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यापूर्वी तिचा मृत्यू झाला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT