Rare Snake Found Khopoli Pudhari
रायगड

Rare Snake Found Khopoli: खोपोलीत दुर्मिळ रंगछटेचा ‘पहाडी तस्कर’ साप आढळला; सर्पमित्रांनी सुरक्षित पकडून जंगलात सोडला

जनुकीय बदलामुळे पांढरट झाक असलेली दुर्मिळ प्रजाती; विहारी परिसरात दिसल्याने अभ्यासकांमध्ये उत्सुकता

पुढारी वृत्तसेवा

खोपोली शहर : दिलीप पवार खोपोली शहरात वास्तव्यास असणारे सर्पमित्र हर्ष सोनावणे आणि नवीन मोरे यांना विहारी गाव परिसरातील भागात एका विशिष्ट रंगछटा असलेल्या पहाडी तस्कर जातीच्या सापाचे दर्शन झाले आहे.

या प्रजातीचे साप पश्चिम घाटाच्या पायथ्याशी असलेल्या या भागात प्रामुख्याने आढळतात. जनुकीय बदलामुळे अंगावर पांढरट झाक असलेला हा साप अभ्यासकांच्या दृष्टीने विशेष चर्चेचा विषय ठरला आहे. सर्पमित्र हर्ष सोनावणे आणि नवीन मोरे यांना हा साप आढळून आला. एका रहिवासी क्षेत्राजवळ हा साप दिसल्यानंतर दोन्ही सर्पमित्रांनी अतिशय कौशल्याने त्याला सुरक्षितरीत्या ताब्यात घेतले.

या सापाचा नैसर्गिक रंग बदललेला असल्याचे दिसून आले. अशा प्रकारचा रंगबदल असलेला साप क्वचितच पाहायला मिळतो.पहाडी तस्कर हा बिनविषारी आणि शांत स्वभावाचा साप मानला जातो. डोंगरदऱ्या आणि पावसाळी हवामानात याचा वावर जास्त असतो.

उंदीर आणि सरडे हे त्याचे मुख्य खाद्य असल्याने निसर्गचक्रात तो महत्त्वाची भूमिका बजावतो. या सापाची वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे मुक्त करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT