BJP NCP Pudhari
रायगड

Raigad ZP BJP NCP Alliance: झेडपीत भाजप, राष्ट्रवादी युतीवर शिक्कामोर्तब

सुनिल तटकरेंनंतर भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशिल पाटील यांनीही दिले युतीचे संकेत

पुढारी वृत्तसेवा

अलिबाग : रायगड जिल्हा परिषदेत भाजप, राष्ट्रवादीची सत्ता येणार हे निश्चित झाले असून, शिवसेनेला सत्तेबाहेर ठेवले जाण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेच्या 59 जागांपकी भाजप राष्ट्रवादी आणि त्यांचे मित्रपक्ष यांच्याकडे 35 जागा आहेत. यामध्ये भाजप 15, राष्ट्रवादी 16 आणि ठाकरे शिवसेना 4, असे 35 चे संख्याबळ आहे. कारण कर्जत खालापुरमध्ये राष्ट्रवादी-ठाकरे शिवसेना निवडणूकपूर्व युती होती.आता राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते सुनिल तटकरे आणि भाजप नेते खा. धैर्यशिल पाटील यांनी 2 पक्षांच्या युतीची घोषणा केली आहे. यापूर्वी भाजपने चंद्रपूरमध्ये ठाकरे शिवसेनेशी युती केलेली असल्याने रायगडमध्येही ठाकरेंची शिवसेना हि भाजप-राष्ट्रवादी बरोबर एकत्र येण्याची शक्यता आहे.

पक्षांनीच सत्तेत सहभागी व्हावे, असे मत स्थानिक पातळीवर व्यक्त केले जात आहे. त्यादृष्टीने दोन्ही पक्षांचे जिल्हास्तरीय नेतेमंडळी विचारविमर्श करत आहेत, असे समजते. शवसेनेला सत्तेत सहभागी करुन घेण्याबाबत जिल्ह्यात मतप्रवाह आहेत. त्यामुळे त्याबाबत काहीही निर्णयझालेला नाही.याबाबत राज्यस्तरावर अद्याप कोणत्याही प्रकारची चर्चा झालेली नाही.वरिष्ठ पातळीवर जर काही चर्चा झाली आणि त्यांच्या आदेशानुसार जिल्हास्तरावर चर्चा करुन निर्णय घेतला जाईल, असेही बोलले जाते. गेल्याच आठवड्यात रोहयो मंत्री भरत गोगावले,आ.महेंद्र दळवी, आ.महेंद्र थोरवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेऊन सत्ता स्थापनेबाबत चर्चा केल्याचे वृत्त प्रसिद्ध झालेले आहे.मात्र, त्यावर मुख्यमंत्र्यांनी कुठलाच ठोस निर्णय जाहीर केलेला नाही.यामुळे शिवसेना सत्तेत सहभागी होणार की नाही याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.

रायगड जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस ठामआहोत. सत्तेत शिवसेनेला सहभागी करुन घ्यायचे की नाही, याबाबत अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. तथापि वरिष्ठ पातळीवरुन काही निर्णयआल्यास त्याबाबत जिल्हा पातळीवर चर्चा करुन निर्णयघेऊ.

खा. धैर्यशील पाटील, दक्षिण रायगड भाजप जिल्हाध्यक्ष

रायगडात जिल्हा परिषदेसाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची निवडणूक पूर्व युती झालेलीआहे.त्या युतीच्या माध्यमातून आमच्याकडे आता पुरेसे संख्याबळ आहे.त्यामुळे जिल्हा परिषदेवर आम्हीच सत्ता स्थापन करणार आहोत हे नक्की.

खा.सुनील तटकरे, प्रदेशाध्यक्ष,राष्ट्रवादी

रायगड जिल्हा परिषदेतील सत्ता स्थापनेबाबत पक्षश्रेष्ठींबरोबर चर्चा करण्यात आली आहे. राज्यात महायुती आहे,या पार्श्वभूमीवर ही चर्चा करण्यात आली.जि.प.मधील सत्ता स्थापनेबाबत निर्णय वरिष्ठ पातळीवरुनच होईल.

ना.भरत गोगावले,रोहयो मंत्री, शिवसेना नेते

भाजप,राष्ट्रवादीचे सदस्य गोव्यात:जिल्हा परिषदेत सत्ता कधी स्थापन होणार हे अद्याप जाहीर झालेले नाही. मात्र,त्यापूर्वीच राष्ट्रवादीआणि भाजपने निवडून आलेल्या जि.प.सदस्यांना गोवा सहलीवर पाठविले आहे. सध्या त्याचीच चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT