Raigad Monsoon Tourism (Pudhari File Photo)
रायगड

Raigad Monsoon Tourism : पावसाळी पर्यटनावर बंदी नको, निर्बंध घाला

प्रशासन, पोलिसांनी योग्य नियोजन करावे; रायगड जिल्ह्यातील पर्यटन व्यावसायिकांची मागणी

पुढारी वृत्तसेवा

मुरुड जंजिरा : सुधीर नाझरे

रायगड जिल्ह्यातील पर्यटन पावसाळी विविध ठिकाणच्या धबधब्यांमुळे बहरते. आता पावसाचा जोर वाढल्याने लवकरच जिल्ह्यातील धबधब्यांवर पर्यटकांची गर्दी वाढणार आहे. मात्र मागील काही वर्षात या पर्यटन स्थळांवर दुर्घटना घडल्या असल्याने प्रशासनातर्फे विविध उपाययोजना करून मोठे निर्बंध घातले जातात. यामुळे पर्यटकांचा हिरमोड होत असून पर्यटन व्यवसायावर परिणाम होत आहे. त्यामुळे प्रशासनाने पावसाळी पर्यटनावर बंदी न घालता ठराविक निर्बंध घालावे, अशी मागणी पर्यटन व्यावसायिकांकडून होत आहे.

रायगड जिल्ह्यात व मुरुड तालुक्यात पाऊस जोरदार सुरु आहे. गेली पाच दिवस १२०० मिली पाऊस झाल्याने पावसाळी पर्यटनासाठी योग्य वातावरण झाल्याने या रविवारपासून धबधबे पर्यटकांनी भरणार आहेत. यावर्षीचा उन्हाळी पर्यटनाचा हंगाम चांगला गेला असल्याने यावर्षी मुरुडला पाऊसाचे प्रमाण जास्त असेल व मुरुड शहर परिसरातील खरआंबोळी धबधबा, गारंबी धबधबा, चिचघर धबधबा, नागशेट धबधबे पाण्याने पूर्ण लवकर भरल्यास मुरुडला पावसाळी पर्यटनाला येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढणार आहे. रायगडाचे पर्यटन पावसाळी विविध ठिकाणच्या धबधब्यामुळे बहरते हॉटेल व्यिसायिकांची आर्थिक कोंडी पासून सुटका पावसाळी पर्यटनामुळे होते. पण यावर्षी पावसाळी पर्यटन रायगडात बहरणार आहे.

पर्यटकांना कोकणाची ओढ लागली आहे. त्यात रायगडात पाऊसाचे प्रमाण खूप असल्याने नदी धबधबे बंधारे पहिल्या पावसातच भरून वाहू लागतात. यावर्षी पाऊस लवकर व जास्त असल्याने रायगडमध्ये पावसाळ्यात पर्यटक आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने येणार आहेत. त्यासाठी मुरुड परिसरातील हॉटेल व्यवसायिक तयारीत आहेत. परंतु दरवर्षी होणारे अपघात पहाता कालच जिल्हाधिकाऱ्यांनी यावर्षी पर्यटकांवर पोलिसांची करडी नजर असणार आहे हे जाहीर केले. मुरुडला पावसाळी पर्यटन वाढीसाठी शासनाचे सहकार्य नियोजनाची गरज बंदी नको. मुरुड तालुक्यात इतर व्यावसायिक पूर्णतः संपले आहेत. पर्यटन व्यावसायावर अवलंबून आहे.

मुरुडला अनेक धबधबे असल्याने येणारे पर्यटकांची संख्या वाढली आहे आणि म्हणूनच पोलिसांनी योग्य नियोजन केल्यास पर्यटन वाढेल अशी आशा मुरुडकरांना आहे. पावसाळी पर्यटनाच्या मर्यादित काळात अमर्याद पर्यटक विविध स्थळांना भेटी देतात. शनिवार-रविवार आणि जोडून सुट्ट्यांच्या काळात तर गर्दीचे विक्रम नोंदविले जातात. याचा परिणाम म्हणून वाहतुकीची कोंडी, टोल नाक्यावरील गर्दी, पार्किंगच्या वाहनांच्या रांगा, हुल्लडबाज पर्यटकांचा त्रास, बेफिकीर पर्यटकांची कचराबाजी, हलगर्जी पर्यटकांचे अपघात, वादावादी आणि शेवटी पर्यटनबंदी होते.

विशेषत: पावसाच्या सरी बरसत असताना कांदाभजी, भुट्टा, नॉनव्हेज, वडा-पाव खात खात भिजतानाचा आनंद घेण्यासाठी पर्यटनस्थळे हाउसफुल्ल होतात. स्थानिक प्रशासन कोलमडते आणि शेवटी बरीचशी पर्यटनस्थळे ऐन हंगामात बंद केली जातात. यातून स्थानिक रोजगार आणि महसूल मोठ्या प्रमाणात बुडतो. तरी होईल व्यवसायिकांची मागणी आहे की धबधबे चालू ठेवा पोलिसांनी नियोजन करून मद्यपींवर कडक कारवाई करा पण अशी पर्यटन स्थळे बंद करू नका, धरणावर जाण्याची वेळ निश्चित करा व वाहनांसाठी पार्कींगची सोय करून पर्यटकांना शिस्त लावण्याचा प्रयत्न सरकारने करावे अशी मागणी पर्यटन व्यावसायिक करीत आहेत.

  • मुरुडला पावसाळी पर्यटनासाठी विशाल समुद्र, गारंबी धारण, सवतकडा धबधबा, चिचघर धबधबा, खरआंबोली डॅम आहे. ही पर्यटन स्थळे विकसित करण्याची गरज आहे. गारंबी धरणावर ओव्हरफ्लो होऊन पाणी नदीला वाहून जाते. त्या बंधाऱ्यावर जाण्यासाठी रस्ता करण्याची गरज आहे. खरआंबिली धरणावर पार्कींगची सोय होणे गरजेचे आहे. पावसाळी पर्यटकांची संख्या कमी असल्याने पावसाळी समुद्राचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक आले तर हॉटेल व्यावसायाला चांगले दिवस येतील.

मुरुड पावसाळ्यात पर्यटक स्थळे फुल्ल असतात. तेथील छोटे व्यावसायिक १ महिन्यात वर्षाचे भागेल एवढे पैसे कमवतात. परंतु मद्य पिऊन अपघात होऊ नये म्हणून पर्यटकांना बंदी घालतात. तरीदेखील पर्यटक धबधब्यावर पोहचतात. त्यात त्यांचे अपघात होतात आणि बंदी जाहीर होते. ते न करता नियोजन करण्याची गरज आहे.
मनोहर बैले, हॉटेल मालक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT