विराज परब
गोवा... नाव घेताच डोळ्यांसमोर उभे राहतात ते समुद्रकिनारे, रात्री उजळून निघणारे बीच, संगीत, निसर्ग आणि "अतिथी देवो भव" ही संस्कृती जपणारे पर्यटन राज्य. देशाच्या कानाकोपऱ्यातूनच नव्हे तर जगभरातून लाखो पर्यटक गोव्याकडे आकर्षित होतात. अनेकांच्या आयुष्यातील आनंदाचे क्षण गोव्याशी जोडलेले असतात.
पण गेल्या काही महिन्यांत समोर येणाऱ्या काही घटनांनी गोव्याच्या पर्यटन प्रतिमेबाबत या गंभीर प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत. या हे. ही. ठवू क्त्त पर्यटकांशी गैरवर्तन, शिवीगाळ, धक्काबुक्की, जबरदस्ती, मारहाण आणि स्थानिक पातळीवरील दादागिरीच्या घटना आता अधूनमधून नव्हे तर वारंवार चर्चेत येत आहेत.
नुकतीच मांद्रे-मोरजी परिसरात सिंधुदुर्गातील परब कुटुंबीयांना काही स्थानिक तरुणांकडून मारहाण झाल्याची घटना समोर आली. या घटनेनंतर सीमाभागात तीव्र पडसाद उमटले आणि बांदा-पत्रादेवी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ही घटना महाराष्ट्रासह गोव्यात मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय ठरली. या घटनेपूर्वीही अशाच काही प्रकारांनी गोव्याच्या पर्यटन संस्कृतीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले होते.
कळंगुट परिसरातील एका बीच शेंकमध्ये बंगळुरूहून आलेल्या पर्यटकांवर आज सोशल मीडियाचे युग आहे. एखादी घटना एका गावापुरती मर्यादित राहत नाही. काही मिनिटांत ती देशभर पोहोचते. गोव्यात घडणाऱ्या प्रत्येक नकारात्मक घटनेचा परिणाम हजारो संभाव्य पर्यटकांच्या मनावर होत असतो. पर्यटन क्षेत्रात विश्वास ही सर्वात मोठी गोष्ट असते. तोच विश्वास डळमळीत होऊ लागला, तर त्याचे परिणाम दूरगामी ठरू शकतात.
लक्षवेधी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या घटनांची गांभीर्याने दखल घेणे अत्यंत आवश्यक आहे. केवळ एखाद्या घटनेनंतर कारवाई करून प्रश्न सुटणार नाही. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी दीर्घकालीन आणि ठोस धोरणाची गरज आहे. संवेदनशील पर्यटन भागांमध्ये वाढीव पोलीस गस्त, पर्यटन सुरक्षा पथके, सीसीटीव्ही व्यवस्था, पर्यटक हेल्पलाइन, स्थानिक युवकांसाठी जनजागृती मोहीम आणि कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई यासारख्या उपाययोजना प्रभावीपणे राबवण्याची वेळ आता आली आहे.
याचबरोबर महाराष्ट्र आणि गोवा या दोन्ही राज्यांतील लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि पोलीस यंत्रणांनी एकत्र येऊन सीमाभागातील पर्यटनाशी संबंधित प्रश्नांवर चर्चा करणे आवश्यक आहे. दोन्ही राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक संबंध आहेत. महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने पर्यटक गोव्यात जात असतात. त्यामुळे अशा घटनांमुळे निर्माण होणारा तणाव दोन्ही राज्यांसाठीही घातक ठरू शकतो.
पर्यटक हे राज्याचे दूत असतात
पर्यटक हे केवळ ग्राहक नसतात; ते त्या राज्याचे अनुभव घेऊन परतणारे दूत असतात. ते जे अनुभव घेऊन जातात, त्यावर त्या राज्याची प्रतिमा उभी राहत असते. त्यामुळे पर्यटकांना सुरक्षित, सन्मानपूर्वक आणि मैत्रीपूर्ण वातावरण देणे ही शासन आणि समाज दोघांचीही जबाबदारी आहे. गोव्याची खरी ओळख ही समुद्रकिनाऱ्यांइतकीच माणुसकी, आदरातिथ्य आणि संस्कृती आहे. काही मोजक्या लोकांच्या चुकीच्या वर्तनामुळे संपूर्ण राज्याची प्रतिमा खराब होऊ नये, यासाठी आता कठोर आणि सकारात्मक दोन्ही पातळ्यांवर प्रयत्न होणे गरजेचे आहे. अन्यथा, पर्यटनाच्या बळावर उभ्या असलेल्या गोव्याच्या प्रतिमेवर उमटणारा हा डाग भविष्यात अधिक गडद होण्याची भीती नाकारता येणार नाही.