Fort Raigad
किल्ले रायगडावरील रोपवे सेवा आजपासून पूर्ववत सुरू करण्यात आली आहे.    File Photo
रायगड

रायगडावरील रोपवे सेवा आजपासून पूर्ववत सुरू

पुढारी वृत्तसेवा

नाते; पुढारी वृत्तसेवा: किल्ले रायगडावर रविवारी (दि.७) झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे स्थानिक प्रशासनाने १० जुलैपर्यंत किल्ल्यावर येण्यास पर्यटकांना बंदी घातली होती. तसेच रोपवे व्यवस्था बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. परंतु आता रायगड किल्ल्यावरील रोपवे सेवा पूर्ववत सुरू करण्याचे आदेश केंद्रीय पुरातत्त्व विभागाने दिल्याची माहिती रोपवे प्रशासनाने आज (दि.११) दिली.

केंद्रीय पुरातत्त्व विभागाने दि. १० जुलैपर्यंत रोपवे बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. आता आज सकाळपासून (दि.११) रोपवे सेवा पूर्ववत सुरू करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

रोपवे १० जुलैपर्यंत बंद ठेवण्याच्या सूचना

दरम्यान, रविवारी झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसानंतर प्रशासनाने सुरक्षिततेचा भाग म्हणून चार दिवसांत वेधशाळेकडून देण्यात आलेल्या इशाराच्या पार्श्वभूमीवर किल्ले रायगडवर जाणारा पायरी मार्ग दि. २१ जुलैपर्यंत तर रोपवे १० जुलैपर्यंत बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या. आजपासून रोपवे पूर्ववत सुरू झाला असून शिवभक्तांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन रोपवे व्यवस्थापनाकडून केले आहे.

SCROLL FOR NEXT