Raigad | रायगड जिल्ह्यातील 14 धरणे 100 टक्के भरली

गेल्या सहा वर्षात प्रथमच जुलैच्या पहिल्या आठवड्यातच मोठा जलसंचय

Dam overflow in Raigad district
रायगड जिल्ह्यातील धरणे ओव्हर फ्लोPudhari Photo

रायगड ः रायगड जिल्हयात गेल्या चार दिवसात झालेल्या सातत्यपूर्ण पावसामुळे रायगड पाटबंधारे विभागाच्या 28 धरणांपैकी 14 धरणे 100 टक्के भरली आहेत. तर जुलै महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात जिल्ह्यातील 28 धरणांमध्ये एकुण 75 टक्के पाणीसाठा झाला असून , गेल्या सहा वर्षांतील धरणांच्या पाणासाठ्याचा हा उच्चांक आहे. 14 धरणांमध्ये शंभर टक्के पाणीसाठा तर उर्र्‍वरित 14 धरणे देखील सरासरी 60 ते 70 टक्के पेक्षा अधीक भरली असल्याने जिल्ह्यातील पिण्यांच्या पाण्याची चिंता मिटणार असल्याचा विश्वास रायगड पाटबंधारे विभागाच्या सुत्रांनी व्यक्त केला आहे.

Summary
  • गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पावसाचे प्रमाण अधिक आहे.

  • 10 जुलैपर्यंत रायगड जिल्हयात एकूण 17 हजार 135 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

  • अलिबाग, उरण, मुरुड, म्हसळा या तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे.

मोठ्या पावसामुळे यंदा धरणांतील जलसंचय वेगाने झाला आहे. जिल्हयातील नदी-नाले, तलाव आणि धरणांमधील पाण्याची पातळी वाढली आहे. मुरुड तालुक्यात फणसाड धरणाची पूर्ण पाणी संचय पातळी 122 मीटर असून सध्या या धरणाची पाणी पातळी 122.20 मीटर आहे. तळा तालुक्यातील वावा धरणाची पूर्ण संचय पातळी 116.30 मीटर असून सध्या या धरणाची पाणी पातळी 116.5 मीटर आहे. रोहा तालुक्यातील सुतारवाडी धरणाची पूर्ण संचय पातळी 93 मीटर असून सध्या या धरणाची पाणी पातळी 93.23 मीटर आहे. ही तीनही धरणे 100 टक्के भरली आहेत. पेण तालुक्यातील आंबेघर धरणाची पूर्ण संचय पातळी 102 मीटर असून सध्या या धरणाची पाणी पातळी 101.5 मीटर आहे. अलिबाग तालुक्यातील श्रीगाव धरणाची पूर्ण संचय पातळी 87.80 मीटर असून सध्या या धरणाची पाणी पातळी 77 मीटर आहे. सुधागड तालुक्यात पाच धरणे असून कोंडगाव धरणाची पूर्ण संचय पातळी 69 मीटर असून सध्या या धरणाची पाणी पातळी 69.15 मीटर असून देत 100 टक्के भरले आहे. घोटवडे धरणाची पूर्ण संचय पातळी 62 मीटर असून सध्या या धरणाची पाणी पातळी 59.90 मीटर, ढोकशेत धरणाची पूर्ण संचय पातळी 62 मीटर असून सध्या या धरणाची पाणी पातळी 56.10 मीटर, कवेळे धरणाची पूर्ण संचय पातळी 56 मीटर असून सध्या या धरणाची पाणी पातळी 56.10 मीटर, उन्हेरे धरणाची पूर्ण संचय पातळी 58 मीटर असून सध्या या धरणाची पाणी पातळी 58.20 मीटर आहे. कवेळे, उन्हेरे 100 टक्के भरली आहेत. श्रीवर्धन तालुक्यात तीन धरणे असून कार्ले धरणाची पूर्ण संचय पातळी 120 मीटर असून सध्या या धरणाची पाणी पातळी 114.7 मीटर, कुडकी धरणाची पूर्ण संचय पातळी 121 मीटर असून सध्या या धरणाची पाणी पातळी 119.85 मीटर, रानीवली धरणाची पूर्ण संचय पातळी 121 मीटर असून सध्या या धरणाची पाणी पातळी 110.10 मीटर आहे.म्हसळा तालुक्यात दोन धरणे असून पाभरे धरणाची पूर्ण संचय पातळी 149 मीटर असून सध्या या धरणाची पाणी पातळी 149.30 मीटर, संदेरी धरणाची पूर्ण संचय पातळी 124 मीटर असून सध्या या धरणाची पाणी पातळी 124.22 मीटर आहे. महाड तालुक्यात चार धरणे असून वरंध धरणाची पूर्ण संचय पातळी 103 मीटर असून सध्या या धरणाची पाणी पातळी 103 मीटर, खिंडवाडी धरणाची पूर्ण संचय पातळी 151.50 मीटर असून सध्या या धरणाची पाणी पातळी 153 मीटर, कोथुर्डे धरणाची पूर्ण संचय पातळी 40 मीटर असून सध्या या धरणाची पाणी पातळी 40.10 मीटर, खैरे धरणाची पूर्ण संचय पातळी 118 मीटर असून सध्या या धरणाची पाणी पातळी 113.10 मीटर आहे. वरील सहाही धरणे 100 टक्के भरली आहेत. कर्जत तालुक्यातील साळोख धरणाची पूर्ण संचय पातळी 87 मीटर असून सध्या या धरणाची पाणी पातळी 79.4 मीटर, अवसरे धरणाची पूर्ण संचय पातळी 100.5 मीटर असून सध्या या धरणाची पाणी पातळी 92.10 मीटर आहे. खालापूर तालुक्यात तीन धरणे असून भिलवले धरणाची पूर्ण संचय पातळी 54.35 मीटर असून सध्या या धरणाची पाणी पातळी 54.2 मीटर असून 100 टक्के भरले आहे.

पाणीसाठ्याची आजची टक्केवारी

फणसाड- 100, वावा- 100, सुतारवाडी- 100, कोंडगाव- 100, वरंध- 100, कवेळे- 100, उन्हेरे- 100,खिंडवाडी- 100, कोथुर्डे- 100, खैरे- 100, मोरबे- 100, भिलवले- 100, आंबेघर- 80, श्रीगाव- 17, घोटवडे- 50, ढोकशेत- 19, कार्ले- 54, कुडली- 87, रानीवली- 16, साळोख- 15, कलोते-मोकाशी- 75, डोणवत- 69, बामणोली- 73, उसरण- 90, पुनाडे- 44, एकूण- 75.36.

14 धरणांतून विसर्ग सुरू

मुरुड- फणसाड, तळा- वावा, रोहा- सुतारवाडी, सुधागड- कोंडगाव, कवेळे, उन्हेरे, म्हसळा- पाभरे, संदेरी, महाड- वरंध, खिंडवाडी, कोथुर्डे, खैरे. खालापूर- भिलवले, पनवेल- मोरबे ही धऱणे 100 टक्के भरली असून त्यातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news