Raigad Bus Accident: कर्नाळ्यात खासगी बसचा अपघात, जखमी, मृतांची नावं समोर; पसार चालकालाही अखेर अटक File Photo
रायगड

Raigad Bus Accident: कर्नाळ्यात खासगी बसचा अपघात, जखमी, मृतांची नावं समोर; पसार चालकालाही अखेर अटक

चालकाविरुद्ध निष्काळजीपणामुळे मृत्यू आणि इतर गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढारी वृत्तसेवा

पनवेल : विक्रम बाबर

रात्रीच्या अंधारात कर्नाळा खिंडीत घडलेल्या एका भीषण अपघाताने पुन्हा एकदा खासगी बससेवेच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. ओमकार ट्रॅव्हल्सची कोकणात जाणारी खासगी बस घाटमाथ्यावर उलटल्याने एक प्रवाशी जागीच ठार झाला, तर ३२ प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातानंतर घटनास्थळावरून फरार झालेल्या बसचालकाला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. अपघातातील जखमी आणि मृत प्रवाशांच्या नावाची यादीही प्रशासनाने जाहीर केली आहे.

कर्नाळा येथे रविवारी रात्री अकराच्या सुमारास मुंबईहून कोकणाच्या दिशेने जाणाऱ्या खासगी बसचा भीषण अपघात झाला. या अपघातानंतर बसचालकाने घटनास्थळावरून पळ काढला. मात्र स्थानिक पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पथकाने रात्रभर शोधमोहीम राबवून सोमवारी सकाळी त्याला अटक केली. पोलिसांनी सांगितले की, चालकाविरुद्ध निष्काळजीपणामुळे मृत्यू आणि इतर गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या अपघाताची बातमी कळताच परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. प्रवाशांच्या कुटुंबीयांमध्ये हवालदिल वातावरण निर्माण झालं असून, रुग्णालयात आप्तस्वकीयांची गर्दी दिसून आली. दरम्यान, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी तातडीने एमजीएम रुग्णालयात भेट देऊन अपघातग्रस्त प्रवाशांची विचारपूस केली. त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून जखमींच्या प्रकृतीबाबत माहिती घेतली तसेच रुग्णांच्या नातेवाइकांशी संवाद साधून त्यांना धीर दिला.

“या अपघातात झालेल्या जीवित आणि वित्तहानीबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधून जखमी प्रवाशांच्या उपचारासाठी आर्थिक मदतीची मागणी केली जाईल,” अशी माहिती आमदार ठाकूर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. या प्रकरणाचा पुढील तपास स्थानिक पोलीस करत असून, बसमालक आणि ट्रॅव्हल्स कंपनीच्या जबाबदारीचा मुद्दा सुद्धा तपासात समोर येण्याची शक्यता आहे.

* मयत प्रवासी नाव

अमोल कृष्णा तळवडेकर वय ३० राहणार राजापूर

* जखमी नावे

१. शंकर नारायण सावंत , वय ६४ वर्षे, रा श्रीगणेश कृष्णा, एस. आर.ऐ, बंदर पाकळी रोड, कांदीवली

२. लक्ष्मी गजानन घुणरे, वय ६५ वर्षे, रा सहयाद्री नगर, भांडूप,

३. सुरेखा रविंद्र सावंत

४. अबीठा पराग सावंत

५. रीना राजेद्र साळसकर, वय ४५ वर्षे, रा- निळेगांव, सुभाष कॉलनी, रूम नंबर ०५, नालासोपारा, ठाणे.

६. राजेद्र अर्जुन साळसकर, वय ४८ वर्षे, रा- निळेगांव, सुभाष कॉलनी, रूम नंबर ०५, नालासोपारा, ठाणे.

७. सानिया राजेद्र साळसकर, वय २३ वर्षे, रा- निळेगांव, सुभाष कॉलनी, रूम नंबर ०५, नालासोपारा, ठाणे.

८. समर्थ संजय साळसकर, वय १२ वर्षे, रा- निळेगांव, सुभाष कॉलनी, रूम नंबर ०५, नालासोपारा, ठाणे.

९. संजय सिताराम साळसकर, वय ४५ वर्षे, रा- निळेगांव, सुभाष कॉलनी, रूम नंबर ०५, नालासोपारा, ठाणे.

१०. जयश्री विश्वास साळसकर, वय ७० वर्षे, रा- निळेगांव, सुभाष कॉलनी, रूम नंबर ०५, नालासोपारा, ठाणे.

११. सिताराम नारायण साळसकर, वय ७४ वर्षे, रा- निळेगांव, सुभाष कॉलनी, रूम नंबर ०५, नालासोपारा, ठाणे.

१२. सुनिल रामचंद्र धुरी, वय ४५ वर्षे, रा रूम नबर ०१, करवकर चाळ, लोकमान्य नगर, ठाणे.

१३. परेश रमाकांत धुरी, वय ३० वर्षे, रा चाळ, लोकमान्य नगर, ठाणे. रूम नबर ०१, करवकर

१४. रूपेश रमाकांत धुरी, वय ३३ वर्षे, रा चाळ, लोकमान्य नगर, ठाणे. रूम नवर ०१, करवकर

१५. संदेश महादेव धुरी, वय २९ वर्षे, रा रूम नंबर ०१, करवकर चाळ, लोकमान्य नगर, ठाणे,

१६. दुर्गा भरत शेटकर, वय-१२ वर्षे, रा- दोडमार्ग उसप, ता. सावंतवाडी, जि.सिंदुदर्ग

१७. भरत कट्टी शेटकर, वय ४३ वर्षे, रा- दोडमार्ग उसप, ता. सावंतवाडी, जि.सिंदुदर्ग

१८. भारती भरत शेटकर, वय ४२ वर्षे, रा- दोडमार्ग उसप, ता. सावंतवाडी, जि.सिंदुदर्ग

१९. आर्या भरत शेटकर, वय १५ वर्षे, रा दोडमार्ग उसप, ता. सावंतवाडी, जि.सिंदुदर्ग

२०. स्नेहा शाम गावकर, वय ४८ वर्षे रा- न्यु अशोक नगर, शेळके चाळ, दहिसर नंबर ६७, कोकणीपाडा, मुंबई.

२१. प्रमोद रामचंद्र चव्हाण वय ६० वर्षे, रा- भांडूप.

२२. प्रणाली प्रमोद चव्हाण वय ५५ वर्षे, रा- भांडूप.

२३. उज्जवला गणपत बोडेकर, वय ५५ वर्षे, रा रूम नंबर ०२, रामचंद्र श्रीनिवास चाळ, डकलाई तुळसिपाडा, भांडूप.

२४. कल्पेश गणपत बोडेकर, वय ३० वर्षे, रा रूम नंबर ०२, रामचंद्र श्रीनिवास चाळ, डकलाई तुळसिपाडा, भांडूप.

२५. शशिकला शिवराम परब वय ५० वर्षे रा जोगेश्वरी

२६. नाविण्या मयुर सावंत वय- १ वर्षे ८ महिणे रा-फिर्यादीप्रमाणे.

२७. नलिनी काशिनाथ पवार, वय रायगड ५२ वर्षे, धोनवत, ता. खालापुर, जि.

२८. सुनील स्टारम ओनकर वय ४६ वर्षे, रा रूम नंबर ३०१, संजय अर्पा, भाडूंप फाटा बीच, भांडूप.

२९. रोशन सदाशिव गमरे वय ३५ वर्षे, रा- पोयसर डेपो जवळ, कैलास बिमालू चाळ, खोली नंबर २, कांदिवली.

३०. सागर चंद्रकांत कदम

३१. रोहित रमेश तरळ, वय ३२ वर्षे, रा शास्त्रीनगर, पोखरण रूम नंबर ०१, रोहित निवास ठाणे (वे)

३२. रूतिका रोहित तरळ उर्फ प्रतिक्षा रविकांत मटकर, वय ३० वर्षे, रा-शास्त्रीनगर, पोखरण रूम नंबर ०१, रोहित निवास ठाणे (वे)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT