Kharif Sowing Begins Raigad (Pudhari Photo)
रायगड

Raigad Kharif season 2025 | रायगडमध्ये खरीपाच्या कामांना येणार वेग

Seed Sowing Raigad Farmers | आतापर्यंत शेतकर्‍यांचे मान्सून पावसामुळे अत्यल्प नुकसान; बियाणे पेरणीची कामे सुरू

पुढारी वृत्तसेवा

सुवर्णा दिवेकर

Kharif Sowing Begins Raigad

अलिबाग : दुष्काळ व अवकाळी पावसाच्या तडाख्यात सापडलेला शेतकरी पुन्हा नव्या जोमाने खरीप हंगामाच्या तयारीला लागला आहे. कृषी विभागाने यंदा 80 हजार हेक्टर खरीप हंगाम पेरणीचे नियोजन केले आहे मात्र मशागत पूर्व कामे झाली होती मात्र राब टाकले गेले नव्हते. त्यामुळे फारसं नुकसान झालं नसल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली . अवेळी पावसाने उन्हाळी भातशेतीचे नुकसान मात्र झाले. त्यांचे पंचनामे सुरु आहेत.

सध्या सुरु असणारा पाऊस हा पेरणीसाठी योग्य नाही त्यामुळे शेतकर्‍यांनी राब टाकण्याची घाई करू नये असते आवाहन कृषी विभाग तर्फे करण्यात आलं आहे. त्यासाठी जिल्ह्यातील शेतकरी ह्यांचे एक सेमिनार घेऊन त्यांना माहिती देण्यात आली असल्याचे कृषी विभागाकडून माहिती देण्यात आली. यावर्षी खरीप हंगामात मूग, मका, तूर, उडीद, सोयाबीन, भुईमूग, बाजरी, ज्वारी, तृणधान्य, गळीत धान्य पीक पेरणीचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. यंदा 80 हजा हेक्टरवर खरिपाचे नियोजन केले आहे. यात ज्वारी, बाजरी, सोयाबीन, मका पेरा सर्वाधिक असण्याचा यंदाही अंदाज आहे. यंदा महागाई मोठ्या प्रमाणात वाढत आहे. याचा परिणाम बी-बियाणे, तसेच खतांवर पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

शेतकर्‍यांना सवलतीच्या दरात बियाणे देण्याच्या अनुषंगाने कृषी विभागातर्फे योजना राबविण्यात येतात. त्यानुसार बियाण्याचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. खरीप हंगामात रायगड जिल्ह्यातील शेतकर्‍यांना दर्जेदार बियाणे, खते उपलब्ध व्हावीत त्याचा काळाबाजार होऊ नये किंवा बोगस बियाणे, खते विकून फसवणूक होऊ नये यासाठी कृषी विभागाकडून दक्षता घेतली जात आहे. जिल्हा आणि तालुकास्तरावर भरारी पदके व तक्रार निवारण समितीची स्थापना करण्यात आली आहे.शिवाय शेतकर्‍यांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी हेल्पलाइन क्रमांक देखील जारी करण्यात आला आहे.

जिल्हास्तरीय भरारी पथकाचे कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद हे पथक प्रमुख तर जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक हे सदस्य सचिव आहेत. आणि तालुकास्तरीय भरारी पथकाचे तालुका कृषी अधिकारी हे पथक प्रमुख असून पंचायत समितीचे कृषी अधिकारी हे सदस्य सचिव आहेत. प्रत्येक तालुक्यासाठी तक्रार निवारण समिती स्थापन करण्यात आली असून समिती खते बियाणे व कीटकनाशकांच्या प्राप्त तक्रारीची दखल घेऊन आवश्यक कारवाई करेल.

खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील 56 हजार 10 हेक्टर क्षेत्रासाठी एकूण पाच हजार 191 क्विंटल बियाणे आवश्यक आहे. जिल्ह्यासाठी 12 हजार 907 मेट्रिक टन खत मंजूर करण्यात आले आहे. जिल्हास्तरीय खरीप हंगाम आढावा सभेमध्ये शेतकर्‍यांना बांधावर खते, बियाणे वितरण मोहीम राबविन्याच्या सूचना दिल्या असल्याने चालू खरीप हंगामात कृषी विभागामार्फत या मोहिमेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. सध्या परिस्थितीत जिल्ह्यात बियाणे व खते पुरवठा सुरळीत झाला असल्याचे जिल्हा अध्यक्ष कृषी अधिकारी वंदना शिंदे यांनी सांगितले.

जिल्ह्यातील शेतकर्‍यांना त्यांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी 8830264335 या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क करता येईल. सर्व कृषी साहित्य विक्रेत्यांना कृषी सेवा केंद्रांमध्ये तक्रार निवारण हेल्पलाइन क्रमांक, भाव फलक ,साठा फलक, परवाना तसेच सदर कृषी सेवा केंद्रामध्ये लिंकिंग केले जात नाही अशा आशयाचा फलक दर्शनी भागात लावण्याच्या सूचना दिल्या आहेत. नियमाचे उल्लंघन करणार्‍या कृषी साहित्य विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

खरीप हंगाम सुरु झाला असुन शेतकर्‍याकडून पिकांसाठी डी .ए. पी खताची ची मागणी मोठ्या प्रमाणावर होत आहे. डी .ए. पी खतात 18 टक्के नंतर व 46 टक्के स्फुरद हो मूलद्रवे आहेत. शेतकर्‍यांना हंगामात डी .ए. पीखताची कमतरता भासल्यास पर्यायी खते युरिया व एस एस पी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. शेतकर्‍यांनी त्याचा अवलंब करावा असे आवाहन अधीक्षक वंदना शिंदे हयांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT