पोलादपूर; पुढारी वृत्तसेवा : मुंबई-गोवा महामार्गावर झालेल्या तुफान पावसामुळे भुयारी मार्गात पाणी साचून तलावाचे स्वरूप आले आहे. तसेच चोलईकडून पोलादपूरकडे येणाऱ्या मार्गावर काटे तळी फाट्याजवळ रस्त्यावर पाणी तुंबून तलावाचे स्वरूप प्राप्त झाले.
मंगळवारी (दि. २६) दुपारनंतर अवघ्या एक-दोन तासात झालेल्या पावसामुळे रस्त्यावर पूरमय परिस्थिती निर्माण झाली आहे यातून मोठा अपघात घडण्याची शक्यता आहे संबंधित ठेकेदार वृत्तपत्रात हे वृत्त नंतर जागे होतात मात्र तेवढया पुरत नंतर परिस्थिती जैसे थे असल्याने व कोणतीही उपाययोजना करत नसल्याने भुयारी मार्गात सुद्धा अपघात होण्याची दाट शक्यता आहे राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभाग या बाबीकडे लक्ष देणार का? की अपघात झाल्यानंतरच याच्यावर उपाययोजना होईल असा प्रश्न पोलादपूर मधील नागरिकांकडून विचारला जात आहे.
अनेक वेळेला ह्या बाबीकडे स्थानिक लोकप्रतिनिधी सुद्धा अधिकाऱ्यांशी संपर्क साधून यावर उपाययोजना करण्यासाठी सुचवले होते मात्र त्यांच्या सूचनांना केराची टोपी दाखवल्याचं दिसून येत आहे काटेतळी फाट्याजवळ थोडासा पाऊस झाला तर तेथे भरपूर प्रमाणात पाणी साचून तेथील वाहतूक बंद होते आत्ताही तीच परिस्थिती होती दुचाकी चार चाकी छोटी वाहने त्या रस्त्यावरून जाऊ शकत नव्हते नेहमीच हा प्रश्न निर्माण होतो संबंधित खाते याकडे लक्ष देणार आहे का आज खरा सवाल आहे
हेही वाचा :