रायगड

Raigad Fort water conservation: किल्ले रायगडावरील संवर्धनाच्या कामांना दुष्काळाची झळ

रायगड प्राधिकरण विभागाकडील कामे थांबवा; महाड पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाचे निर्देश

पुढारी वृत्तसेवा

श्रीकृष्ण बाळ

महाड: एल-निनोच्या पार्श्वभूमीवर राज्यात दुष्काळाचे सावट निर्माण झाले असून राज्यातील जलाशयांमधील पाण्याचा साठा केवळ पिण्याच्या पाण्यासाठी राखून ठेवण्याचे राज्य सरकारचे बंधन असल्याने त्या आदेशाची अंमलबजावणी करत किल्ले रायगडावरील भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण रायगड प्राधिकरण विभागाकडील विकास कामे थांबवण्याचे आदेशच एक प्रकारे महाड पंचायत समितीच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने नुकतेच भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाला दिले आहेत.

आता भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग तसेच रायगड प्राधिकरण या निर्देशाची अंमलबजावणी करते का याकडे रायगड वाशी यांचे डोळे लागून राहिले आहेत. राज्यात सप्टेंबर पासूनच पावसाने ओढ दिल्याने त्याचा परिणाम पिण्याच्या पाणीपुरवठा व मोठ्या प्रमाणावर होणार असल्याने राज्य सरकारने उपलब्ध जलसाठा केवळ पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित करण्याचे बंधन राज्यातील महानगरपालिका सहित नगरपरिषदा, नगरपंचायती, नगरपालिका, यासह जिल्हा परिषद व पंचायत समित्यांना तसेच शासकीय पातळीवरील सर्व विकास कामांसाठी आवश्यक असणारे पाणी वापरण्यास बंधने येण्याची शक्यता वर्तवली आहे .

याच पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडावर येणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळा शिवजयंती तसेच अन्य कार्यक्रमासाठी व पर्यटकांसाठी पुरेसा पाण्याचा साठा उपलब्ध व्हावा या दृष्टीने रायगड जिल्हा परिषदेच्या महाड पंचायत समितीने भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाला विकास कामांसाठी पाणी वापरण्यास बंदी केली आहे.

रायगड जिल्हा परिषदेच्या महाड येथील पंचायत समिती कार्यालयात असणाऱ्या पाणीपुरवठा विभागाने २७ ऑक्टोबर २०२६ रोजी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग यांना पत्र लिहून किल्ले रायगडावर दररोज मोठ्या प्रमाणावर शिवप्रेमी व शिवभक्त हजेरी लावतात सालावादाप्रमाणे ६ जून २०२७ रोजी गडावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा कार्यक्रमाकरिता व इतर वेळी शिवभक्त व शिवप्रेमी मोठ्या प्रमाणात हजेरी लावतात तरी गडावर येणाऱ्या शिवप्रेमी व शिवभक्त यांना पिण्याच्या पाण्याची सोय करणे करिता किल्ले रायगडावरील गंगासागर ,कोळिंब तलाव व काळा हौदाचे पाणी पिण्यास वापरत असतात.

गडावर रायगड प्राधिकरण व पुरातत्त्व विभागाकडून बांधकामे चालू आहेत त्यासाठी कोलीम तलाव गंगासागर व काळा हाैद तलावातील पाण्याचा वापर करण्यात येऊ नये. कोलीम तलाव गंगासागर व काळा हाैद तलावातील पाणी हे जून ६ पर्यंत पुरवण्याकरिता पाण्याचा बांधकामासाठी वापर करण्यात येऊ नये, अशा आशयाची सूचना रायगडावरील विकास कामे करणाऱ्या संबंधित ठेकेदारांना देण्यात यावे. रायगडवर येणाऱ्या सर्व शिवभक्तांसाठी तलावावरून नळ पाणीपुरवठाद्वारे पाणीपुरवठा केला जातो.

कोलीम तलाव, गंगासागर तलाव, काळा हौद या तलावातील पाणी बांधकामासाठी व इतर कामासाठी वापरण्यात येऊ नये अशी सूचना वजा विनंती त्यांनी पत्राद्वारे भारतीय पुरातत्व विभाग रायगड जिल्हाधिकारी पालकमंत्री व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले असल्याचे या लेखी पत्राने स्पष्ट झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT