Uran local youth employment: बंदर उरणमध्ये, प्रकल्प उरणमध्ये; मग भूमिपुत्रांच्या हाताला काम कधी

जेएनपीए आणि औद्योगिक प्रकल्पांच्या झगमगाटात स्थानिक तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न ऐरणीवर
Uran local youth employment
Uran local youth employmentPudhari
Published on: 
Updated on: 

पंकज ठाकूर

कोप्रोली उरण: देशाच्या आर्थिक विकासात महत्त्वाची भूमिका बजावणारे जेएनपीए बंदर, ओएनजीसी, विविध औद्योगिक प्रकल्प, कंटेनर यार्ड आणि लॉजिस्टिक कंपन्यांचे जाळे उरण परिसरात विस्तारत आहे.

औद्योगिकीकरणामुळे उरणची ओळख जागतिक नकाशावर ठळक झाली असली, तरी याच भूमीत राहणाऱ्या स्थानिक तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न मात्र अद्याप अनुत्तरित असल्याची भावना व्यक्त होत आहे. परिसरात मोठमोठे प्रकल्प उभे राहत असताना उरणच्या भूमिपुत्रांना प्रत्यक्ष रोजगाराच्या किती संधी मिळतात, हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.

उरण तालुक्यातील अनेक तरुण उच्चशिक्षित असून अभियांत्रिकी, आयटीआय, डिप्लोमा, पदवी आणि विविध तांत्रिक अभ्यासक्रम पूर्ण करून रोजगाराच्या शोधात आहेत. मात्र स्थानिक औद्योगिक आस्थापनांमध्ये नोकरी मिळवताना त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याच्या तक्रारी ऐकायला मिळतात.

काही तरुणांना अनुभवाची अट, काहींना आवश्यक कौशल्यांचा अभाव, तर काहींना भरती प्रक्रियेतील अपुऱ्या माहितीमुळे संधीपासून दूर राहावे लागत असल्याचे चित्र आहे.

Uran local youth employment
Sai Dongar Project Protest: टोरंट प्रकल्पाविरोधात आदिवासी समाजाचा एल्गार

प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा!

उरणमधील सर्व प्रमुख औद्योगिक आस्थापनांनी स्थानिक कर्मचाऱ्यांची संख्या, रिक्त पदे, नव्या भरतीचे नियोजन आणि कौशल्य प्रशिक्षणाची माहिती सार्वजनिक करावी, अशी मागणी पुढे येत आहे. तहसील प्रशासन, जिल्हा प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि औद्योगिक व्यवस्थापन यांनी संयुक्त रोजगार आढावा बैठक घेऊन स्थानिक युवकांसाठी ठोस कृती आराखडा तयार करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Uran local youth employment
Kandivali Stall Demolition: कांदिवलीत ५० वर्षे जुना स्टॉल पाडल्याने संताप; शिवसेना ठाकरे गटाचे ठिय्या आंदोलन

आता केवळ आश्वासने नकोत, रोजगाराचा हिशेब द्या!

उरणचा विकास हा केवळ बंदरांचा, कंटेनर यार्डचा आणि औद्योगिक कंपन्यांचा विकास ठरू नये. या विकासात स्थानिक तरुणांचा वाटा निश्चित झाला पाहिजे. उरणच्या भूमीत प्रकल्प उभे राहत असताना येथील तरुणांना नोकरीसाठी इतर शहरांचे दरवाजे ठोठावावे लागणार असतील, तर या विकासाचे फलित नेमके कोणाला मिळत आहे, असा सवाल स्थानिकातून उपस्थित होणे स्वाभाविक आहे.

उरणच्या तरुणांना दान नको, त्यांच्या पात्रतेनुसार रोजगाराची संधी हवी आहे. आता उद्योगांनी आणि प्रशासनाने आकडेवारीसह उत्तर देण्याची वेळ आली आहे!

प्रकल्पग्रस्तांच्या त्यागाचे फलित मग काय?

उरणमधील औद्योगिक विकासासाठी स्थानिक शेतकरी, मच्छीमार आणि ग्रामस्थांनी विविध प्रकारचे बदल आणि त्याग सहन केले आहेत. जमिनींचे संपादन, पारंपरिक व्यवसायांवरील परिणाम आणि वाढत्या औद्योगिकीकरणामुळे स्थानिकांच्या जीवनशैलीत बदल झाले. मात्र या विकासाचा लाभ स्थानिक तरुणांच्या रोजगाराच्या रूपाने कितपत मिळाला, याचा पारदर्शक आढावा घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

रोजगाराच्या संधी आहेत, मग स्थानिक मागे का?

उद्योगांमध्ये तांत्रिक, प्रशासकीय, सुरक्षा, वाहतूक, यंत्रसामग्री हाताळणी, लॉजिस्टिक्स आणि व्यवस्थापन अशा विविध क्षेत्रांत रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. मात्र या संधींची माहिती स्थानिक तरुणांपर्यंत पोहोचते का? कंपन्यांच्या भरती प्रक्रियेत स्थानिक उमेदवारांना प्राधान्य दिले जाते का? स्थानिक तरुणांना आवश्यक प्रशिक्षण देण्यासाठी कोणती व्यवस्था आहे? या प्रश्नांची उत्तरे मिळणे आवश्यक आहे.

प्रकल्पग्रस्तांच्या त्यागाचे फलित मग काय?

उरणमधील औद्योगिक विकासासाठी स्थानिक शेतकरी, मच्छीमार आणि ग्रामस्थांनी विविध प्रकारचे बदल आणि त्याग सहन केले आहेत. जमिनींचे संपादन, पारंपरिक व्यवसायांवरील परिणाम आणि वाढत्या औद्योगिकीकरणामुळे स्थानिकांच्या जीवनशैलीत बदल झाले. मात्र या विकासाचा लाभ स्थानिक तरुणांच्या रोजगाराच्या रूपाने कितपत मिळाला, याचा पारदर्शक आढावा घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

रोजगाराच्या संधी आहेत, मग स्थानिक मागे का?

उद्योगांमध्ये तांत्रिक, प्रशासकीय, सुरक्षा, वाहतूक, यंत्रसामग्री हाताळणी, लॉजिस्टिक्स आणि व्यवस्थापन अशा विविध क्षेत्रांत रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. मात्र या संधींची माहिती स्थानिक तरुणांपर्यंत पोहोचते का? कंपन्यांच्या भरती प्रक्रियेत स्थानिक उमेदवारांना प्राधान्य दिले जाते का? स्थानिक तरुणांना आवश्यक प्रशिक्षण देण्यासाठी कोणती व्यवस्था आहे? या प्रश्नांची उत्तरे मिळणे आवश्यक आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.