Poladpur Water Scarcity Raigad Pudhari
रायगड

Poladpur Water Scarcity Raigad: पोलादपूर तालुक्यावर आजही पाणीटंचाईचे सावट

प्रलंबित धरण प्रकल्प, गाळमुक्त मोहिम आणि जलमंदिर संकल्पना राबविल्यास कायमस्वरूपी तोडगा शक्य

पुढारी वृत्तसेवा

पोलादपूर : समीर बुटाला

रायगड जिल्हयातील दुर्गम तालुका असलेल्या पोलादपुरावर आजही पाणीटंचाईचे सावट कायम आहे. तालुक्यातील सुमारे सव्वाशे गाव-वाड्यांवर पाणीटंचाईचे सावट असते. त्यामुळे उन्हाळ्यात अनेक गाववाड्यांना पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागतात. तालुक्यातील पाणी पुरवठ्याचे नियोजन आणि धरण प्रकल्प मार्गी लागल्यास येथील पाणी टंचाईचा प्रश्न दूर होऊ शकतो.

पोलादपूर तालुक्यातील पाणी टंचाईचे सावट कायमस्वरूपी दूर करण्यासाठी तालुक्यातील मंजूर असलेले अनेक धरणांची कामे पूर्ण करणे व नदी जोडसह पाण्याचे नियोजन योग्य पद्धतीने केल्यास पोलादपूर तालुकाकडे पाणी टंचाई मुक्त तालुका म्हणून बघितला जाईल व सिंचन क्षेत्रात वाढ होऊन तालुका हा हिरवाईने सजलेला दिसेल यासाठी नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींनींसह अधिकारी वर्गाने योग्य पद्धतीने कार्यवाही व ठोस अंमलबजावणी करणे गरजेचे बनले आहे.

पोलादपूर तालुक्यातील प्रलंबित धरणाची कामे मार्गी लागल्यास सिंचन क्षेत्रात वाढ होऊन तालुक्यातील पाणी टंचाई वर होणार लाखो रुपयांचा खर्च वाचणार असून तालुका टंचाई मुक्त सह हिरवेगार होणार आहे मात्र मागील काही वर्षात धरणाची कामे थांबलेली असल्याने त्याचे भोग भोगावे लागत आहेत. येथील पाटबंधारे विभागाची अनेक धरणांची कामे निम्म्यापेक्षा जास्त पूर्ण होऊन पूर्णत्वाचा प्रतीक्षेत आहे त्यातच जलयुक्त शिवार ,नाम फाऊंडेशन, पाणी चळवळ साठी काम करणाऱ्या सेवाभावी संस्थांना हाताशी धरत गाळमुक्त नदी धरण, तलाव मोहीम राबविणे क्रमप्राप्त बनले असून पावसाळ्यात पावसाचे पाणी अडविल्यास त्या पाण्याचा बारामहिने उपयोग होणार आहे

मात्र लोकप्रतिनिधी याचे या तालुक्यातील गावाकडे लक्ष नसल्याने व दुर्गम असल्याने विकासापासून वंचित राहिले आहेत. दोन महत्वाचे मार्ग या तालुक्यातुन जात असले तरी तालुका उपेक्षित राहिला आहे. उन्हाळ्यात नेहमीच टँकर धावत असल्याने टंचाई कृती आराखडा वर्षेन वर्षे वाढत आहे . धरणप्रमाणे जलमंदिर संकल्पना राबविणे जेणेकरून वर्षे भर पाणी उपलब्ध होईल व पाण्याची बचत होऊन पाणी टंचाई वर मात करणे सुलभ होणार आहे. सिंचन क्षेत्रात वाढ झाल्यास पुन्हा शेती व्यवसायाला चालना मिळाल्यास इतर कामाची पूर्तता करणे शक्य होणार आहे.

राज्यात असणाऱ्या धरणांमुळे कोट्यवधी नागरिकांच्या पिण्याचे पाणी व ग्रामीण भागात सिंचनाच्या माध्यमातून अन्नधान्याची सोय झाल्याने त्यांना जलमंदिर म्हटले जाते. महाराष्ट्रात ब्रिटिश राजवटीत बांधलेली शंभर वर्षांपूर्वीची धरणे अजूनही सुस्थितीत आहेत, पण त्यानंतरच्या काळात बांधलेल्या धरणांना अगदी कमी आयुर्मानातच ‌‘घरघर‌’ लागली आहे. पुराच्या पाण्याच्या सोबत वर्षानुवर्षे वाहून येणारा गाळ आणि धरण उभारणीमधील त्रुटींमुळे पाणी गळती वाढली असून, यामुळे धरणांचा उपयुक्त साठा काही टक्क्यांनी कमी झाला आहे. या वर मात करण्यासाठी धरणातील गाळ काढत त्यातील लिकेज काढणे आवश्यक आहे.

देशात राज्यात असणाऱ्या धरणांमुळे कोट्यवधी नागरिकांच्या पिण्याचे पाणी व ग्रामीण भागात सिंचनाच्या माध्यमातून अन्नधान्याची सोय झाल्याने त्यांना जलमंदिर म्हटले जाते. महाराष्ट्रात ब्रिटिश राजवटीत बांधलेली शंभर वर्षांपूर्वीची धरणे अजूनही सुस्थितीत आहेत, पण त्यानंतरच्या काळात बांधलेल्या धरणांना अगदी कमी आयुर्मानातच ‌‘घरघर‌’ लागली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT