महेंद्र खैरे
रेवदंडा: पावसाळा सुरू झाला की तरूणाईला वेध लागतात ते वर्षासहलींचे, डोंगर कपाऱ्यातील वाहणाऱ्या धबधब्यातील धरणातील घावणारे पाणी अंगावर घेण्यासाठी आतुरलेली युवा मंडळी वर्षा सहलीचे प्लॅनिंग करतात, मुरूड तालुक्यात्तील फणसाड अरण्यातील फणसाड डॅमला तरूणाईच्या उत्साहाचा बहर वर्षा सहलीच्या निमित्ताने पहावयास मिळतो.
फणसाड धरणातून बोर्ली पंचक्रोशीतील २२ गावांना पाणीपुरवठा करते. शासनाच्या पाटबंधारे विभाग कोलाडच्या अखत्यारीत हे धरण असल्याचे सांगितले जाते.
परंतु नजीकच्या भोईवर ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या फणसाड धरणाचा सोयरेसुतक नसल्याचे यथील ग्रामस्थांनी सांगितले. त्यामुळे ग्रामपंचामतीमार्फत मेथे वर्षासहली प्रेमी मंडळीसाठी सुविधा पुरविल्या जात नाही असे म्हटले जाते.
मूलभूत सुविधांचा अभाव
फक्त पावसाळी फणसाड डॅमला वर्षा सहलीच्या निमित्ताने मोठी गर्दी होते. मात्र अनेक सुविधाचा अभाव येथे आढळतो, बाहेरून वर्षा सहलीसाठी येणाऱ्या मंडळींना रस्त्यावर कुठेही मार्गफलक नसल्याने चुकीच्या मागनि जात नाही ना, अशी शंका मनात घेऊनच पुढे सरकावे लागते. रस्त्यावरून जाणाऱ्या ग्रामस्थांना फणसाड डॅम कुठे हा प्रश्न पावसाळी नित्याचा प्रश्न फणसाड डॅमला वर्षा सहलीच्या निमित्ताने तरूणाईची मोठी पंसती आहे.
पावसाळ्यात दर शनिवार तसेच रविवारी मोठी गर्दी पहावयास मिळते. डोंगर कपारीत वसलेल्या निसर्ग सौंदर्याची मुक्त हस्ते उधळण असलेल्या परिसर यवा वर्गाला भावतो, मनमोकळेपणांनी एक वेगळा आनंद मिळविता मेतो. धरणातून वाहून जाणान्या पाण्यात ओलेचिंब भिजत बसण्याची मज्जा काही औरच असते. नेहमीच दगदगीच्या जीवनातून वनडे पिकनिक म्हणून फणसाड डॅमचे महत्व पावसाळ्यांत दिवसेंदिवस वाढत आहे.
असे या फणसाड डॅमला
बोर्ली येथून अंदाजे ६ ते ७ किमी अंतरावरील वळणा वळणाच्या रस्त्याने जाऊन भोईघर गावावरून पुढे काजुवाडी, बेलवाडी गावाच्या पुढे डोंगरात फणसाड अरण्यातील फणसाड डॅमवर जाता येते. पावसाळी पाण्याने तुंडूब भरलेले धरण तसेच आजुबाजूच्या डोंगर कपारीतील मनमोहक दृष्य, धरणावरून काजुवाडी तसेच बेलवाडी गावासह धरणामुळे परिसरातील हिरवीगार शेतीतील नागरीचे दृश्य डोळ्यांना विलोभनिय निसर्गसोदर्यांनी भुरळ पाडते