पनवेलः पनवेल महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी संपुष्टात येतअसतानाच आता तालुक्यात राजकीय रणधुमाळी सुरु झालेली आहे.रायगड जिल्हा परिषदेसह पनवेल पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी मंगळवारी भाजप उमेदवारांनी आपापले अर्ज दाखल केले.
माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजप जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, ज्येष्ठ नेते जे. एम. म्हात्रे तसेच राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत यांच्या नेतृत्वाखाली ही अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पार पडली. यावेळी उमेदवारांसोबत आमदार प्रशांत ठाकूर, राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत, माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, जिल्हा उपाध्यक्ष गणेश कडू, तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, पनवेल पूर्व मंडल अध्यक्ष भूपेंद्र पाटील, गरसेवक शशिकांत शेळके, नगरसेविका प्रतिभा भोईर, माजी जिल्हा परिषद सदस्य एकनाथ देशेकर, अमित जाधव, माजी पंचायत समिती सदस्या रत्नप्रभा घरत, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आनंद ढवळे यांच्यासह कृष्णा पाटील, संतोष पाटील, शिवाजी दुर्गे, महेश पाटील, विजय मुरकुटे, डॉ. संतोष आगलावे, विचुंबे सरपंच प्रमोद भिंगारकर, विद्याधर मोकल, विद्याधर जोशी तसेच पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयापासून ढोल-ताशांच्या गजरात व घोषणांसह रॅली काढण्यात आली. ही रॅली पनवेल तहसीलदार कार्यालयात पोहोचून निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.
नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची अंतिम तारीख 21 जानेवारी असून, छाननी 22 जानेवारी रोजी होणार आहे. 5 फेब्रुवारी रोजी मतदान तर 7 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार असून व्ही. के. हायस्कूल, पनवेल येथे मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे.
मंगळवारी केळवणे जिल्हा परिषद मतदारसंघातून मंगेश वाकडीकर व वावंजे जिल्हा परिषद मतदारसंघातून कमला देशेकर यांनी, वावंजे पंचायत समिती गणासाठी आरती कुणाल काटे, चिंध्रण पंचायत समिती गणातून अंकुश खेर यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. उर्वरित जिल्हा परिषद व पंचायत समिती गणातील उमेदवार बुधवारी 21 जानेवारी रोजी अर्ज दाखल करणार आहेत.
वावंजे, नेरे, पाली देवद, पळस्पे, वावेघर, वडघर, गव्हाण, केळवणे
वावंजे, चिंध्रण, नेरे, आदई, पालीदेवद, विचुंबे, पळस्पे, कोन, पोयंजे, वावेघर, करंजाडे, वडघर, वहाळ, गव्हाण, केळवणे, आपटा