पनवेल : रेल्वेच्या प्रवासी डब्यातून कोणते सामान घेऊन जावे याविषयी रेल्वे मंत्रालयाने तिकीट तपासणी करणा-यांना धोरण जरी ठरवून दिले असले, तरी याच धोरणामुळे नामवंत पोल व्हॉल्टर्सपटूंना (बांबू उडीपटू) प्रवासा दरम्यान रेल्वे कोंडीचा सामना पनवेलमध्ये करावा लागला आहे. ही घटना पनवेल रेल्वेस्थानकात घडली.
रेल्वे तिकीट तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी पोल व्हॉल्टर्सपटू देवकुमार मीना आणि कुलदीप यादव यांच्या प्रवासादरम्यान ते त्यांच्यासोबत असलेला पोल प्रवासी डब्यातून घेऊन जाऊ शकत नाही यावर आक्षेप घेतला. एवढा महाग पोल सामानाच्या डब्यातून तुटल्यास काय करावे, असा प्रश्न या पोल व्हॉल्टर्सपटूंना पडला. विनंती केल्यावर सुद्धा तिकीट तपासणी करणाऱ्यांनी न ऐकल्यामुळे त्यांची नियोजित रेल्वेगाडी सुटली.
तब्बल पाच तासानंतर त्यांना पोलच्या प्रवासाचा अतिरीक्त शुल्काचा भरणा केल्यावर रेल्वेचा पुढील प्रवास करता आला. या घटनेनंतर संबंधित विक्रमवीरांनी देशाच्या क्रीडा धोरण ठरविणाऱ्यांंसाठी एक ध्वनीचित्रफीतून आवाहन करून क्रीडापटूंना प्रवासादरम्यान अडविणारे धोरण बदला, अन्यथा क्रीडापटू घडतील याविषयी साकडे घातले आहे.
रेल्वेच्या प्रवास नियमांनुसार मोठ्या आकार व वजनाचे सामानाची वाहतूक प्रवाशांनी करताना सामान डब्याचा वापर करावा. एकेनवेळेला येणाऱ्या सामानाची शुल्क भरले नसल्यास त्याची अतिरीक्त शुल्क भरून पावती घ्यावी आणि त्यानंतर प्रवास करावा असा नियम आहे. याच नियमामुळे पनवेल रेल्वेस्थानकामध्ये विक्रमवीर मीना आणि रेल्वेचे तिकीट तपासणी करणा-या कर्मचा-याचा वाद सुरू झाल्याचे सांगीतले जाते.
प्रत्येक पोलची किंमत दोन लाख रुपयांपर्यंत आहे. हा पोल तुटल्यास किंवा खराब झाल्यास खेळाडूचे मोठे आर्थिक नुकसान होते. सात पोल असलेल्या संचाची काळजीपूर्वक वाहतूक करणे अत्यावश्यक असते. मात्र, सध्या रेल्वे किंवा विमान प्रवासात असे सामान नेण्यासाठी कोणतीही सुस्पष्टता सरकारी नियमात नसल्याची खंत विक्रमवीर मीना यांनी व्यक्त केली.
देशाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या खेळाडूंना प्रवासादरम्यान मूलभूत सुविधा व सवलती मिळाव्यात, तसेच क्रीडा साहित्य वाहतुकीसाठी स्वतंत्र नियम व सुरक्षित व्यवस्था निर्माण करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या घटनेमुळे देशातील आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंसह स्थानिक खेळाडूंना सुद्धा अद्यापही मूलभूत अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
पाच तास वाया गेले
देवकुमार मीना यांनी दिलेल्या माहितीनुसार यामुळे त्यांचे तब्बल पाच तास त्यांचे वाया गेले. किमान दोन लाख रुपये किमतीचा हा पोल रेल्वे तसेच विमान प्रवासात नेण्यास बंदी असल्याने सरकारने क्रीडा धोरणात अशा क्रीडा वस्तूंसाठी स्पष्ट तरतूद करावी, अशी मागणी मीना यांनी केली आहे. रेल्वेच्या सामानाची वाहतूक करणा-या डब्यातून महागडा पोलाच्या सूरक्षेविषयीची चिंता जसी विक्रमवीर मीना आणि यादव यांना लागली आहे.
पाच तास वाया गेले
देवकुमार मीना यांनी दिलेल्या माहितीनुसार यामुळे त्यांचे तब्बल पाच तास त्यांचे वाया गेले. किमान दोन लाख रुपये किमतीचा हा पोल रेल्वे तसेच विमान प्रवासात नेण्यास बंदी असल्याने सरकारने क्रीडा धोरणात अशा क्रीडा वस्तूंसाठी स्पष्ट तरतूद करावी, अशी मागणी मीना यांनी केली आहे. रेल्वेच्या सामानाची वाहतूक करणा-या डब्यातून महागडा पोलाच्या सूरक्षेविषयीची चिंता जसी विक्रमवीर मीना आणि यादव यांना लागली आहे.