Drowning Incident  Pudhari Photo
रायगड

Raigad drowning death : ‘पळसदरी‌’मध्ये घणसोलीच्या युवकाचा बुडून मृत्यू

मृतदेह बाहेर काढण्यात रेस्क्यू टीमला यश

पुढारी वृत्तसेवा

खोपोली ः खालापूर व कर्जत तालुक्याच्या मध्यावर असणाऱ्या पळसदरी धरण परिसरात एक हृदयद्रावक घटना घडली असून, 20 वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. आर्यन थापर (रा. घणसोली) असे मृत तरुणाचे नाव आहे.

आर्यन थापर हा भारती विद्यापीठात बीबीए प्रथम वर्षाचा विद्यार्थी होता. कॉलेजच्या सोशल प्रोजेक्टनिमित्त तो सुमारे 70 ते 75 विद्यार्थ्यांसोबत मंगळवारी पळसदरी येथे आला होता. कार्यक्रम आटोपल्यानंतर आर्यन आपल्या मित्रांसह धरण परिसरात गेला.

आर्यनला पोहता येत असल्याने तो पाण्यात उतरला. दोन वेळा पोहत जाऊन तो सुरक्षित परतही आला. मात्र, तिसऱ्यांदा पाण्यात उतरल्यानंतर तो अचानक खोल पाण्यात बुडल्याने मित्रांनी तत्काळ आरडाओरड करत मदतीसाठी धावपळ केली, मात्र त्याला वाचवण्यात यश आले नाही.

पोलीस कर्मचारी व खोपोली येथील हेल्प फाउंडेशनच्या रेस्क्यू टीमने घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम सुरू केली. मात्र अंधारामुळे मोहीम थांबवावी लागली. बुधवारी सकाळी शोधमोहीम सुरु केली असता, रेस्क्यू टीमला आर्यनचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT