Padmadurg fort Pudhari
रायगड

Padmadurg Fort: शिवरायांच्या पद्मदुर्ग किल्ल्याला जेट्टीची प्रतीक्षा

गडप्रेमीआणिपर्यटकांमध्येकमालीचीनाराजी; पर्यटन वाढीसाठी गडावर शिवस्मारक बनवणे गरजेचे

पुढारी वृत्तसेवा

सुधीर नाझरे

मुरुड जंजिरा: पद्मदुर्ग ऊर्फ कासा किल्ला हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात असलेला 1676 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला जलदुर्ग आहे.शिवरायांच्या पदस्पर्शाने पवन झालेला पद्मदुर्ग किल्ला जेट्टीच्या प्रतीक्षेत आहे.

जंजिरा किल्ल्यासाठी नुकतेच 100 कोटी खर्चून जेट्टी बांधण्याचे कामसुरू होऊन काम पूर्ण झाले. मात्र शिवरायांच्या पद्मदुर्ग किल्ल्यासाठी जेट्टी बांधण्यासाठी प्रतीक्षा का करावी लागते.महाराष्ट्रातील गडकिल्ले यांचे संवर्धन करावे अशी सरकारची भूमिका असताना शिवरायांचा पद्मदुर्ग वंचित का? कोकण कडाचे अध्यक्ष सुरेश पवार व पद्मदुर्गाचे अध्यक्ष अशील ठाकूर यांची पद्मदुर्ग किल्ल्यासाठी जेट्टी किंवा फेल्टिंग जेट्टी) बनवण्याची मागणी पुरातत्व विभागाकडे केली, त्यानंतर रायगडचे खा. सुनिलजी तटकरे .

महेंद्र दळवी यांनी पुरातत्वखात्याच्या अधिकाऱ्यांना घेऊन पद्मदुर्ग किल्ल्याला भेट दिली आणि आदेश दिली कि तातडीने फ्लोटिंग जेट्टी व गडाची दुरुस्ती स्वच्छता करण्यात यावी त्याप्रमाणे अधिकऱ्यांनी तातडीने आराखडे बनवण्याचे काम सुरु केल्याने पत्रकांना सांगितले.

परंतु त्या भेटीला आज 1 वर्ष झाले अजून कोणतेही काम सुरु झाल्याने दिसत नसल्याने शिवप्रेमी नाराज आहेत. खासदारांनी लक्ष देण्याची गरज आहे.शिवरायांनी बांधलेला पद्मदुर्ग किल्ला पर्यटकांना सहज पाहता यावा यासाठी जलवाहतूक सेवा व पर्यटकांना उतारण्यासाठी अद्ययावत जेट्टी आवश्यक आहे.या जेट्टीची मागणी गेली अनेक वर्ष होत असून शासन त्याकडे दुर्लक्ष करत आहे हि खेदाची बाब आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी सिद्दीवर धाक बसावा म्हणून या किल्ल्याची बांधणी केली.महाराजांनी बांधलेल्या जलदुर्ग किल्ल्यांपैकी पद्मदुर्ग किल्ला महत्त्वाचा आहे.छत्रपती शिवाजी महाराजांनी आणखी काही जलदुर्ग बांधले त्यापैकी म्हणजे सिंधुदुर्ग, कुलाबा किल्ला हे आहे.

मुरुड जंजिरा किल्ल्यावरून पद्मदुर्गकडे जाण्यासाठी आपल्याला बोटीमधून जावे लागते. पद्मदुर्गजवळ असलेल्या जंजिरा किल्ल्यामुळे सिद्दी अतिशय प्रबळ झाला होता.सिद्धीच्या आरमारच्या सामर्थ्याने त्यांनी किनारपट्टीवर दरारा निर्माण केला होता.

सिद्धीच्या अत्याचाराला थांबवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी मुरूडच्या समुद्रामध्ये कासव आकारअसलेल्या बेटावर पद्मदुर्ग किल्ला बांधण्याचा निर्णय घेतला.पद्मदुर्ग किल्ल्याचे दुसरे नाव कासा किल्ला असे पण आहे.पद्मदुर्ग किल्ल्याचे बांधण्याचे काम 1676 मध्ये झाले.पद्मदुर्ग किल्ल्याबद्दल छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात की, “पद्मदुर्ग वसवून राजापुरीच्या (जंजिरा) उरावरी दुसरी राजापुरी उभी केली आहे.

पद्मदुर्ग किल्ल्याचे दोन भाग आहेत एक मुख्य किल्ला आणि त्यासमोरील पडकोट असे आहे.पडकोट मोठ्याप्रमाणावर नाहीसा झालेला परंतु मुख्य किल्ल्याची तटबंदी मात्र अजूनही उत्तमपणे चांगली आहे.पडकोट हा शत्रूला चकवा देण्यासाठी बांधला गेलेला आहे.

पद्मदुर्ग किल्ल्याची वैशिष्ट्य म्हणजे तटबंदीच्या दोन दगडांमधे सिमेंटिंग म्हणून चुना वापरला आहे, परंतु साडेतीनशे वर्षांपासून असलेले दगड सागराच्या खाऱ्या पाण्याने तटबंदीचा दगड एकदम भिजून गेला परंतु चुना अजूनही चांगला आहे.छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले जलदुर्ग पण आपल्याला चकित होण्यासारखे आहे.या बुरुजाच्या वरचा भाग फुललेल्या कमळाच्या पाकळ्यांप्रमाणे दिसून येतो. म्हणूनच याला पद्मदुर्ग असे नाव दिले गेले असावे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT