खोपोली : अष्टविनायकापैकी एक तीर्थक्षेत्र असलेल्या महाड येथील श्री वरद विनायक मंदिराचा जीर्णोद्धार केला जाणार आहे.यासाठी देवस्थानच्यावतीने परिसरातील जागेचा सर्व्हे केला जात आहे.मात्र,या मोजणीला मंगलम कापूर उत्पादक कंपनीने विरोध दर्शविल्याने कंपनीविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.या कंपनीमध्ये कंपनीत श्री.क्षेत्र महाड देवस्थानची 52 गुंठे जागा मुख्य प्रवेशद्वारासमोर असल्याचे निष्पन्न झालेले आहे.
या जागेची रितसर शासकीय सर्व्हे करण्यासाठी अधिकारी व देवस्थानचे विश्वस्त,व्यवस्थापक कंपनीत आले होते. यादरम्यान कंपनी व्यवस्थापनाने उपस्थित अधिकारी,विश्वस्तांना कंपनीच्या आत प्रवेश करण्यास रोखून धरल्यामुळे अधिकाऱ्यांना सर्व्हे न करता परत जावं लागल्याने कंपनी व्यवस्थापना विरोधात प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे.
कुंभिवली गावातील कापूर उत्पादक मंगलम् कंपनीत श्री.क्षेत्र महड देवस्थानची मालकीची सर्व्हे नं 27 /1 आणि 25 /3 मधील 52 गुंठे जागा कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर देवस्थानने शासकीय सर्व्हे करण्यासाठी रितसर पैसे भरून परवानगी मिळवली होते. त्यानुषगांने भूमी अभिलेख विभागाचे मोजणीदार पोलिस बंदोबस्तात मंगलम् कंपनीत प्रवेश करण्यासाठी गेले असता कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वारावर अडविण्यात आले.
त्यामुळे भूमी अभिलेख विभागाचे मोजणीदार अधिकारी दिपमाला राजपूत आणि देवस्थान कमिटीचे विश्वस्त किरण काशिकर,व्यवस्थापक अतुल टट्टू आणि कर्मचाऱ्यांना तीन ते चार तास कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर बसून रहीले होते. त्यामुळे मोजणीदार अधिकारी दिपमाला राजपूत यांना सर्व्हे करून देण्यासाठी कंपनीच्या आत प्रवेश करू न दिल्याचा पंचनामा केला तशा उपस्थित साक्षिदारांच्या सह्या घेवून निघून गेल्या.