कोलाड : विश्वास निकम
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग 66 वरील वरसगांव-भिरा फाट्यावर उड्डाण पुल न बनविल्यामुळे या महामार्गांवर अपघाताची मालिका सुरु आहे.याला जबाबदार मुंबई-गोवा हायवेचे अधिकारी तसेच संबंधित ठेकेदार हे असल्याचे बोलले जात आहेत.
मुंबई गोवा हायवेवरील अनेक छोट्या गावासाठी उड्डाण पुल बनविण्यात आला आहे.पण मुरुड-भिरा मार्गांवरून पुणे बाजूकडे जाणाऱ्या राज्यमार्गांवरील भिरा फाट्यावर उड्डाण पुल असावा असे महामार्ग अधिकारी व संबंधित ठेकेदार यांना जाणीव का झाली नाही.का मुंबई-गोवा मार्गांवरील भिरा फाट्यावर डोळे मिटून सर्व्हे केला काय? असे या मार्गांवरून प्रवास करणारे प्रवाशी नागरिकांकडून बोलले जात आहे.
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेली 17 वर्षांपासून सुरु असुन ते एका वर्षात पूर्ण ही होईल.यामुळे या महामार्गांवर वाहनांचा वेग वाढणार आहे. वाहनांचा वेग कमी करण्यासाठी येथे गतिरोधक बसविण्यात आले आहेत.ते निस्कृष्ठ दर्जाचे असल्यामुळे हे गतिरोधक वेगाची नशा अपघाताचे कारण ठरत आहे.
या गतिरोधकामुळे गेल्या महिन्यात एकाच दिवशी दोन टुव्हीलर स्वरांचा अपघात झाला.या अपघातात टुव्हीलर स्वार गंभीर जखमी झाले होते.तसेच गेल्या आठवड्यात दोन फोरव्हीलर एकमेकांना आदळून अपघात झाला व सर्व प्रवाश्यांना किरकोळ मार लागल्यामुळे ते थोडक्यात बचावले. परंतु दरवेळी असेच होईल असे नाही.
मुंबई-गोवा महामार्गांवरून गोव्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर आंबेवाडी बाजारपेठेत उड्डाण पुलाचे काम सुरु असल्यामुळे त्या ठिकाणी मातीचे ढिगारे ठेवले आहेत. त्या ठिकाणी काम सुरु असल्याचे फलक लावण्यात आले आहेत.परंतु ते फक्त दिवसा दिसण्यासाठी सक्षम आहेत. रात्रीच्या वेळी या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे रिप्लेक्टर तसेच कोणत्याही प्रकारच्या प्रकाशाची सोय नसल्यामुळे वाहन चालकांना पुढील परिस्थितीची कल्पना येत नाही यामुळे या ठिकाणी अपघाताचा धोका वाढला आहे.
मुंबई-गोवा महामार्गांचे काम हे 2026 पर्यंत पूर्ण होईल अशी डेडलाईन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली असुन यामुळे हे काम पूर्ण झाल्यानंतर भिरा फाट्यावर वाहतूकीचा वेग अधिक वाढणार आहे. यामुळे या मार्गांवरून प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. येथे अंडरपास रस्ता होणे महत्वाचे आहे.परंतु याची गरज का वाटली नाही ही मोठी आश्चर्याची गोष्ट आहे. हे झाले नाही तर नाही. पण आता येथे ब्लिकिंग सिग्नल लावणे आवश्यक आहे.तसेच गेल्या वर्षांपासून येथे पथदिवे लावण्यात आले आहेत.परंतु त्याचा प्रकाश अद्याप ही पडला नाही ते त्वरित सुरु करावे.तसेच हायवेचे अधिकारी व संबंधित ठेकेदार यांनी येथील अपघात टाळण्यासाठी उपाययोजना करावी .विश्वास बागुल, कुणबी समाज युवा कार्यकर्ते, वरसगांव