नेरळ : आनंद सकपाळ
काही दिवसा पूर्वी तालुक्यातील उमरोली ग्रामपंचायत हद्दीत अल्पवयीन मुलासह इतर नागरिकांवर एका पिसाळलेल्या भटक्या श्वानानी हल्ला करून जखमी केल्याची घटना घडली होती, या हल्ल्यातील 9 वर्षीय मुलाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
कर्जत-कल्याण राज्यमार्गावरील उमरोली ग्रामपंचायत हद्दीत 3 जानेवारी रोजी पोतदार सोसायटी मधील , उमरोली गावातील प्रसाद लोंगले व नागो घारे यांच्यासह आणखी तिघांवर भटक्या पिसाळलेल्या श्वानाने हल्ला केल्याची घटना घडली होती. या सर्वांना उपचाराकरीता रायगड हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते. मात्र या भटक्या पिसाळलेल्या श्वानाच्या हल्ल्यामध्ये 9 वर्षीय ऋषिकेश पवार हा गंभीर जखमी झाला असल्याने, त्याला पुढील उपचाराकरीता मुंबई येथील केईएम हॉस्पिटल येथे उपचाराकरीता दाखल करण्यात आले होते. मात्र त्याचा सुरू असलेल्या उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.
या घटनेमुळे शाळेत जाणाऱ्या मुलांसह कामधंदा करिता बाहेर पडणारे नागरिक हे प्रचंड भीतीच्या सावटाखाली वावरत होते. भटक्या श्वानांपासून अल्पवयीन व शाळेतील मुलांस नागरिकांचे संरक्षणासाठीची उपाययोजना ही उमोरोली ग्रामपंचायतीने करावी तसेच या भटक्या श्वानांना या परिसरात सोडणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्या विरोधात कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी ही नागरिकांकडून केली गेली होती. मात्र भटक्या श्वानांची संख्या जैसे थे असल्याने, व भटक्या श्वानाच्या हल्ल््यात ऋषिकेश पवार याचा दुर्दैवी अंत झाला.
शासन प्रशासनाच्या विरोधात नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात असुन, आशा भटक्या श्वानांच्या यांचिकेनुसार सर्वोच्च न्यायालयाच्या देण्यात आलेल्या निर्णयानुसार कार्यवाही ही शासन व प्रशासनस्तरावरून होताना दिसत नसल्याने व परस्थिती जैसे थे व भटक्या श्वानांचा प्रश्न हा गंभीर झाला असल्याने, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची शासन व प्रशासनाला विसर पडला का? की पायमल्ली केली जात आहे का? असे प्रश्न देखील नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत.