नेरळ ः नेरळ पेशवाई येथे झालेल्या गोळीबार प्रकरणातील बंदूक आणि हल्लेखोरांनी वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे. नेरळ येथे राहणारे सचिन भवर यांच्यावर हा गोळीबार करण्यात आला होता. नेरळ ते दामत रेल्वे फाटक दरम्यान डम्पिंग ग्राउंडच्या जवळील पुलाच्या अलिकडे आले असताना पाठीमागून दुचाकीवरून आलेल्यांपैकी पाठीमागे बसलेल्या व्यक्तीने बंदुकीतून दोन राऊंड गोळीबार केला होता.त्यानंतर ते दोघे फरारी झालेले होते.
नेरळ पोलिसांनी मोठ्या कौशल्याने तपास करत फरार आरोपी अविनाश जगन्नाथ मार्के, नेरळ, व दी पक विनायक कोळेकर, नाशिक याना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता .10 डिसेंबरपर्यंत कोठडी देण्यात आली आहे.तपासात आरोपींनी गुन्हयात वापरलेला गावठी कट्टा, राउंड व गुन्हयात वापरलेली मोटार सायकल क्रमांक एम.एच.1 डी.ई.8518 असा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे. पुढील तपास हा नेरळ सपोनि शिवाजी ढवळे हे करीत आहेत.
आरोपी अविनाश जगन्नाथ मार्केवर खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, चोरी, आर्म ॲक्ट व इतर अशा प्रकारचे 15 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. तसेच आरोपी दीपक विनायक कोळेकर याच्यावर खुनाचा 1 गुन्हा दाखल असल्याचे समोर आले आहे.हल्ल्याचे नेमके कारण मात्र समजले नाही. पोलिसांनीही आरोपींकडून हल्ल्याबाबतचे कारण शोधण्याचा प्रयत्न केला आहे.