रोह्यात राष्ट्रवादी विरुद्ध शिंदे शिवसेना लढत pudhari photo
रायगड

Raigad ZP PS Election : रोह्यात राष्ट्रवादी विरुद्ध शिंदे शिवसेना लढत

जि.प. 14, पं.स.साठी 25 उमेदवार रिंगणात

पुढारी वृत्तसेवा

रोहे ः जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असुन रोहा तालुक्यात जिल्हापरीषदे गटच्या 4 जागेसाठी 14 उमेदवार रिंगणात आहेत.तर पंचायत समिती गणाच्या 8 जागेसाठी 25 उमेदवार रिंगणात आहेत.

रोहा तालुक्यात बहुतेक ठिकाणी राष्ट्रवादी (अजित पवार गट) विरोधात शिवसेना (शिंदे गट) अशी लढत पाहावयास मिळणार आहे. तर काही ठिकाणी राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना (ठाकरे ) अशी लढाई पहावयास मिळणार आहे. रोहा तालुक्यात काही ठिकाणी दुरंगी लढत, तर काही ठिकाणी तिरंगी व काही ठिकाणी चौरंगी लढत पाहावयास मिळणार आहे.

जि.प. गटातील उमेदवार

  • नागोठणेः सुमीत काते (शिवसेना शिंदे ), किशोर जैन राष्ट्रवादी (अप), साईनाथ दिगंबर धुळे (मनसे),

  • आंबेवाडी ः निधी जाधव - राष्ट्रवादी (अप), सीमा महाबळे शिवसेना (शिंदे ),

  • भुवनेश्वर ः मधुकर पाटील राष्ट्रवादी (अप), संदेश मोरे शिवसेना (शिंदे),नितीन वारंगे, शिवसेना (उबाठा), दिप चंद्रकांत वायडेकर अपक्ष

  • घोसाळे ः सुश्रुता सुभाष पाटील भाजप, संचिता सचिन फुलारे शिवसेना (उबाठा), उर्वशी उदेश वाडकर शिवसेना (शिंदे गट), रोहीणी रामचंद्र सकपाळ राष्ट्रवादी (अजित पवार गट), वैष्णवी हेमंत ठाकुर शेकाप.

पंचायत समितीचे उमेदवार

नागोठणे ः समृध्दी कोळी राष्ट्रवादी (अप), अंजली दुर्गावले शिवसेना (उबाठा), सुकेळी ः योगीता विलास शिद, भाजप, अरुणा जानु हंभीर शिवसेना (उबाठा), गुलाब धर्मा वाघमारे शेकाप, कोलाड ः जगन्नाथ धनावडे राष्ट्रवादी (अप), शोभा सरफळे शिवसेना (शिंदे ), आंबेवाडी ः सुरेश महाबळे शिवसेना (शिंदे गट), संजय मांडलुस्कर राष्ट्रवादी (अप), धाटाव ः विजया पाशिलकर राष्ट्रवादी (अप), स्वप्नाली मोरे शिवसेना (शिंदे गट), सुप्रिया वारंगे शिवसेना (उबाठा), भुवनेश्वर ः संतोष सोनु खेरटकर शिवसेना (शिंदे गट), सुरेश धोंडु मगर राष्ट्रवादी (अप), न्हावे ः वर्षा देशमुख शिवसेना (शिंदे गट), सिद्दीका समिर धसाडे भाजप, शिवाणी परेश म्हात्रे राष्ट्रवादी (अजित पवार गट), रुपाली गणेश मढवी शेकाप, ऋषाली तानाजी म्हात्रे अपक्ष, घोसाळे ः मनोहर गोरे शिवसेना (शिंदे गट), प्रकाश लक्ष्मण धुमाळ भाजप, सचिन अनंत फुलारे शिवसेना (उबाठा), किसन गणपत मोरे राष्ट्रवादी (अजित पवार गट), शंकर सिताराम दिवकर शेकाप, गणेश बाळाराम भगत अपक्ष.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT