रायगडात नपा निवडणुकीत राष्ट्रवादीचाच ‌‘गजर‌’ pudhari photo
रायगड

Raigad municipal election results : रायगडात नपा निवडणुकीत राष्ट्रवादीचाच ‌‘गजर‌’

तीन नगराध्यक्षांसह 70 नगरसेवक विजयी, दुसऱ्या स्थानी शिंदेशिवसेना, ठाकरे तिसऱ्या स्थानी

पुढारी वृत्तसेवा

अलिबाग : राज्यात महायुती असली तरी रायगड जिल्ह्यात 10 नगरपरिषदा मध्ये वेगवेगळ्या युती पहायला मिळाली. महायुती मधे असणारे पक्ष निवडणुकीत एकमेकांसमोर निवडणूक लढवित असल्याचे चित्र होते. रायगड जिल्ह्यातील 10 नगरपरिषदांची मतमोजणी पार पडली. नगरपरिषद निकालाच्या आकडेवारीकडे नजर टाकल्यास राष्ट्रवादी काँग्रेसला (अप) रायगडकरांनी पहिली पसंती दिल्याचे दिसून येते. राष्ट्रवादी काँग्रेस खालोखाल रायगडकरांनी शिवसेना (शिंद ) व भाजपच्या बाजूने कौल दिला आहे. जिल्ह्यात चौथ्या क्रमांकावर शिवसेना ठाकरे) तर पाचव्या स्थानी शेकाप राहिला आहे.

जिल्ह्यातील अलिबाग, मुरुड, पेण, रोहा, श्रीवर्धन, महाड, कर्जत, खोपोली, माथेरान आणि उरण या दहा नगरपरिषदांसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया राबविण्यात आली होती. जिल्ह्यातील 10 नगरपरिषदांमध्ये नागरध्युध पदासाठी 34 तर 207 नगरसेवक पदांसाठी 575 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात नशीब अजमावत होते. निवडणुकीसाठी मतमोजणी रविवारी करण्यात आली.

जिल्ह्यातील 10 पैकी मुरुड, रोहा, कर्जत नगरपरिषद नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी (अजित पवार गट) उमेदवार विजयी झाले आहेत. तर खोपोली, महाड, माथेरान नगरपरिषदेत शिवसेना (शिंदे गट), श्रीवर्धन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), अलिबाग शेतकरी कामगार पक्ष, उरण राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार), पेण भाजप नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विजयी झाले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) व शिवसेना (शिंदे गट) यांचे नगराध्यक्ष पदाचे प्रत्येकी 3 उमेदवार निवडून आले असले तरी, 207 नगरसेवक पदांच्या जागांसाठी सर्वाधिक उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) निवडून आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) 70 तर शिवसेना (शिंदे गट) 51 उमेदवार नगरसेवक पदाच्या निवडणुकीत विजयी झाले आहेत. त्या खालोखाल भाजपचे 35, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) 21, शेतकरी कामगार पक्ष 20, काँग्रेस 3, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार 2 उमेदवार नगरसेवक पदाच्या निवडणुकीत विजयी झाले आहेत. तसेच अपक्ष व इतर आघाड्यांचे 5 उमेदवार नगरसेवक पदाच्या निवडणुकीत विजयी झाले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT