पनवेल : विविध कारवाईंमध्ये नवी मुंबई पोलिसांनी जप्त केलेले अंमली पदार्थ.  pudhari photo
रायगड

Drug destruction : नवी मुंबईत २६.३० कोटींचे ७२६ किलो अमली पदार्थ नष्ट

आतापर्यंत ११३.४४ कोटींचे अमली पदार्थ नष्ट

पुढारी वृत्तसेवा

पनवेल : नशामुक्त नवी मुंबई अभियानांतर्गत नवी मुंबई पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधातील कारवाई अधिक तीव्र केली आहे. विविध गुन्ह्यांमध्ये जप्त केलेले ७२६ किलो वजनाचे व तब्बल २६ कोटी ३० लाख रुपये किमतीचे अंमली पदार्थ बुधवारी कायदेशीर प्रक्रियेचे पालन करून नष्ट करण्यात आले. तळोजा येथील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट कंपनीच्या प्रकल्पात ही कारवाई करण्यात आली.

विविध पोलीस ठाण्यांत दाखल २०१ गुन्ह्यांत जप्त केलेले अंमली पदार्थ नष्ट करण्याची प्रक्रिया राबवण्यात आली. यावेळी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, सहपोलीस आयुक्त दीपक साकोरे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, नवी मुंबई पोलिसांनी आतापर्यंतच्या कारवाईत १९२ गुन्ह्यांत जप्त केलेले ११३ कोटी ४४ लाख रुपये किमतीचे अंमली पदार्थ नष्ट केले आहेत.

नवी मुंबई परिसरात अंमली पदार्थांची विक्री किंवा तस्करी होत असल्याची माहिती मिळाल्यास नागरिकांनी ८८२८-११२-११२ या हेल्पलाईन क्रमांकावर माहिती द्यावी. याप्रकरणी नागरिकांची ओळख गोपनीय ठेवण्यात येणार असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT