Navi Mumbai International Airport Cargo Pudhari
रायगड

Navi Mumbai International Airport Cargo: नवी मुंबई विमानतळावर हाँगकाँगचे मालवाहू विमान

हाँगकाँग येथून हाँगकाँग एअर कार्गोचे पहिले समर्पित आंतरराष्ट्रीय मालवाहू विमान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले.

पुढारी वृत्तसेवा

पनवेल: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने जागतिक व्यापार आणि लॉजिस्टिक्सच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा गाठला. हाँगकाँग येथून हाँगकाँग एअर कार्गोचे पहिले समर्पित आंतरराष्ट्रीय मालवाहू विमान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले.

आगामी काळात आणखी १३ नवीन आंतरराष्ट्रीय मालवाहू सेवा सुरू होणार आहेत. हाँगकाँग एअर कार्गोतर्फे हाँगकाँग आणि नवी मुंबई दरम्यान आठवड्यातून तीन सेवा चालविण्यात येणार आहेत.

त्यातून आयात-निर्यात मिळूनसुमारे ६० टन मालाची वाहतूक केली जाणार आहे. आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक क्षेत्रातील विस्ताराला वेग देताना नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने अल्पावधीत दोन महत्त्वाचे टप्पे गाठले आहेत.

१५ जुलै२०२६ रोजी एअर इंडिया एक्सप्रेसची अबुधाबीला जाणारी पहिली आंतरराष्ट्रीय प्रवासीसेवा सुरू झाली. त्यानंतर १ ऑगस्ट २०२६ रोजी इंडिगो कार्गोची शारजाहला जाणारी पहिली समर्पित मालवाहू सेवा सुरूकरण्यात आली.

यातून औषधे, नाशवंत वस्तू, मौल्यवान वस्तू, अवजड माल हाताळणी होत आहे. युरोप आणि आशियातील प्रमुख शहरांसाठी विविधआंतरराष्ट्रीय मालवाहू विमान कंपन्यांनी सेवा सुरू करण्यासाठी अर्ज दाखल केलेअसून त्यांना मंजुरीही मिळाली आहे.

यामध्ये हाँगकाँग, चेंगडू, बँकॉक, तैपेई, क्वालालंपूर, सिंगापूर, अबुधाबी, दोहा, फ्रँकफर्ट, इस्तंबूल, दुबई, ॲमस्टरडॅम, बहरीन, पॅरिस आणि रियाध या प्रमुख शहरांचा समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT