खारघर ः नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उड्डाण भरण्यास तयार झाले असून 25 डिसेंबर ही तारीख सिडकोकडून घोषित करण्यात आली आहे.तेव्हापासून विमानतळा लगतच्या असणाऱ्या नोडमधील बांधकाम व्यावसिकांना सुगीचे दिवस आले आहेत. देश विदेशातील व्यावसायिक मंडळीचे येणेजाणे या पुढे नवी मुंबई आंतर राष्ट्रीय विमानतळावरुनच इथूनच होणार असल्याने गृहप्रकल्प उद्योगाला मोठी चालना मिळणार असल्याने गृहप्रकल्प व्यावसायिकांनी आपापल्या स्तरावर नियोजन सुरु केले आहे.
अटल सेतूचा कनेक्ट साऊथ मुख्य मुंबईला जोडणारा असून. उच्चभ्रू लोकाची वस्ती म्हणून या भागाची ओळख आहे.या भागात वाहन पार्किंग समस्या ही मुख्य आहे.अरुंद रस्ते, लहान आकाराची घरे आणि गगनाला भिडणाऱ्या किमती या तुलनेत मोकळी हवा आणि नवी मुंबईतील गृहप्रकल्प हे मोठे फ्लॅट साईजचे आहेत. मोठे रस्ते ,शाळा, हॉस्पिटल,अशा विशेष नियोजनावर भर देत सिडकोने नवी मुंबईची रचना केली आहे.त्यामुळे उलवे नोड सह पुष्पकनगर ,जे एन पी टी नोडला मोठे गृह प्रकल्प नामांकित बिल्डर लोकांचे उभे राहू लागले आहेत.
देशभरातून मुंबई नगरीशी व्यावसायिक संबंध असणारी मंडळी नवी मुंबई विमानतळाच्या लगत घर घेऊन गुंतवणूक करू पाहत आहेत. 25 डिसेंबर ही टेक ऑफची तारीख जाहीर झाल्यानंतर उलवे नोड मधील घराचे भाव चौरसफूटाला 500 रुपये ते 1000 रुपयाने वाढले आहेत.शिवाय भाडेवाढ ही कमालीची झाली आहे.नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापासून 10 कीमी अंतरावर असणारे गोदरेज,हिरानंदानी, वाधवा सिटी,इंडिया बुल्स,मोठ्या टाऊनशिप प्रकल्पाला मोठ्या प्रमाणात घर विक्रीचा प्रतिसाद मिळू लागला आहे.
नुकतीच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उच्च अधिकारी वर्ग यासाठी एकाच दिवशी 400 घराची खरेदी वाधवा सिटी मध्ये झाली असून विमानतळा पासून 30 मिनिट अंतरावर हा प्रकल्प आहे.खारघर मधील बीकेसी 2 हा बहुउदेशीय प्रकल्पाला तत्वता मंजुरी मिळाली असून 2026 मध्ये भूमिपूजन होईल ,नवी मुंबई मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला चारही बाजूंनी रस्त्याची उत्तम जोडणी असून वाहतूक कोंडी होणार नाही असे नियोजन करण्यात आले आहे.
नियोजित आंतरराष्ट्रीय उच्च शिक्षण संस्था ही या भागात सिडकोने राखीव ठेवलेल्या भूखंडावर उभे राहणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे. विमानतळा पाठोपाठ अनेक सरकारी प्रकल्प मार्गी लागत असताना त्यात 2 वर्षात सिडको अंतर्गत नैना टाऊन शिप देखील सिडको निर्माण करत आहे. याची व्याप्ति विमानतळापासून 10 कीमी अंतरावर आहे.पुढील 10 वर्षात वाढणारे पनवेल शहर याचा विचार करून रस्ते ,पाणी याची उपाययोजना विचारात घेऊन सिडको भूखंड खुले करत आहे.
दोन वर्षांच्या मंदि नंतर पून्हा बुकींगला चालना
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उद्घाटन झाल्या पासून मागील 1महिन्या पासून ग्राहकाची घर घेणेसाठी पसंती नवी मुंबईत वाढत आहे.मागील 2 वर्ष मंदीत असणारे बुकिंग आता पून्हा सुरू झाले असून.बांधकाम क्षेत्रात तेजी आल्याचे चित्र असल्याची माहिती बांधकाम व्यावसायिकांशी बोलताना प्राप्त झाली आहे.