मुरुड जंजिरा ः मुरुड शहर पर्यटन क्षेत्र असुन याठिकाणी पर्यटकांची संख्या वाढविण्यासाठी आमदार महेंद्रशेठ दळवी यांनी शहराच्या विकासासाठी व सुशोभीकरणासाठी करोड रुपयांची निधी देऊन शहराचा कायापालट करण्यात आला.मात्र असे असले तरी काही मुख्य समस्या या शहराला नेहमीच भेडसावत आल्या असून त्या कायमच दुर्लक्षित राहिल्या आहेत.
त्यामध्ये प्रामुख्याने येणारा प्रश्न म्हणजे मुरुड शहरांमध्ये प्रवेश करणारा व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अखत्यारीत येणारा परेश नाका ते एकदरा पुला जवळ पर्यंत येणारा रस्त्याची अक्षरक्ष चाळण झाली आहे.या रस्त्यामुळे शहराच्या विकासावर विपरीत परिणाम करीत असून पर्यटकांची संख्या रोडवली आहे.यामुळे रोजगारावर परिणाम होत आहे.या रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष करत आहेत.
मुरुड जंजिरा नगर परिषदेच्या हद्दीमध्ये असणारे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अख्त्यारीत येणारे रस्ते हे सदर विभागाने नगर परिषदेकडे वर्ग करावेत अशा स्वरूपाचा प्रस्ताव नगरपरिषदेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आला होता.त्या प्रस्तावाला तातडीने पुढे घेऊन हा रस्ता मुरुड जंजिरा नगरपरिषद अखत्यारीत घ्यावा आणि नगरपरिषदेच्या फंडातून हा रस्ता बनवावा. जेणेकरून येथील स्थानिक नागरिकांना व पर्यटकांना होणारा त्रास कमी होईल व शहराच्या नावलौकिकात भर पडेल व शहाराची प्रतिमा सुधारणेस सहकार्य होईल.
तसेच मच्छी मार्केट व भाजी मार्केट या परिसरात रस्त्याचे दुतर्फा बसून विक्री करीत आहेत त्यावर ठोस निर्णय घेऊन योग्य ती बैठक व्यवस्था करून द्यावी जेणेकरून रस्त्यावर होणारी गर्दी व वाहतुकीस होणारा अडथळा कमी होईल. मुख्य बाजारपेठ येथील भगवान श्री महावीर भाजी मार्केट या परिसरात अनधिकृत फेरीवाले व रस्त्यावर लावण्यात येणाऱ्या फळ व भाजी विक्रेते यांच्या हात गाड्या यांची देखील घ्यावी.जेणेकरुन या ठिकाणी वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही.
निवेदन देतेवेळी नगरसेवक तथा ॲड. रुपेश पाटील,ॲड.कुणाल जैन, नगरसेवक - श्रीकांत खोत,दिपक पालशेतकर,दिपक मयेकर,किरण सुर्वे,आशिष पालशेतकर,किरण सतविकर,गणेश मिरजणकर,शैलेश वारेकर उपस्थित होते.या निवेदनावर एस बी आय बॅक मॅनेजर - सचिन गणविर, हिंदू एज्युकेशन सोसायटीचे मुख्यध्यापक - प्रविता गार्डी आदिंसह 100 जण नागरिकांनी या निवेदनावर सह्या करण्यात आल्या.
समुद्रकिनाऱ्यांवर रस्त्याचा अगदी कडेला दुतर्फा लावण्यात आलेल्या खाद्यपदार्थांचा गाड्या व स्टॉल लावण्यात आले आहेत.याठिकाणी योग्य ती ठोस उपाययोजना आपण कराव्यात अशी मागणी निवेदनाद्वारे नगरसेवक रुपेश शंकर पाटील यांनी केली.