Raigad ZP Election : चाकरमानी मतदारांवर उमेदवाराचे भवितव्य ठरणार

पोलादपुरात पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदारांची संख्या अधिक
Raigad ZP Election
Vote Pudhari
Published on
Updated on

पोलादपूर : पोलादपूर तालुक्यात 39 हजार 232 मतदार आहेत. यामध्ये महिलाही संख्या 262 ने जास्त असल्याने त्याची मते निर्णायक ठरणार आहे. तालुकात रोजंदारचे मार्ग नसल्याने बहुतांशी मतदार बाहेर गावी असल्याने त्याची मते ज्या उमेदवाराच्या पारड्यात पडणार त्याचे मात्यधिक्य विजयाच्या दृष्टीने निर्णायक ठरणार आहे. या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत शिंदे गट शिवसेना व शेकाप युती विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस भाजप इतरांमध्ये वर्चस्वाची लढाई दिसून येत आहे.

आजवरचा निवडणूक इतिहास पहाता चाकरमानी मतदारांनी शिवसेनाच्या मागे उभे राहिल्याचे चित्र पाहावयास मिळाले आहे.मात्र गेल्या तीन वर्षात दोन पक्षात पडलेले फूट व काँग्रेसचे ग्रामीण भागाकडे होणारे दुर्लक्ष शेकापच्या अस्तित्वाचा प्रश्न बघता चिन्ह महत्वपूर्ण ठरणार आहे तालुक्यातील घड्याळ,कमल, धनुष्यबाण,पंजा व ढोबळी मिरची आदी चिन्ह मशीनवर असल्याने मतदार कोणती चाणक्य नीती अवलंबत आहे याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

महाड मतदार संघातील पोलादपूर तालुका हा महत्त्वाचा व निर्णायक समजला जातो 2 जिल्हा परिषद 4 पंचायत समिती व 1 नगरपंचायत असलेला पोलादपूर तालुक्यातील मतदार निवडणूकीमध्ये निर्णायक भूमिका बजावत आहेत. यापूर्वी निवडणूक काळात तालुक्यात 1 शिवसेना, 1 शेकाप काँग्रेस आघाडीचे जिल्ह्या परिषद,तर पं.स.मध्ये 2 काँग्रेस 1 शेकाप काँग्रेस आघाडी तर 1 सेना असे संख्या बळ होते, पोलादपूर न.पं. मध्ये शिंदे गट शिवसेनेचे प्राबल्य जास्त आहे तर महत्व अशा काही ग्रामपंचायतीवर आमदार गोगावले याच्या गटाचे प्राबल्य आहे. पाच वर्षात राज्यातील राजकीय चित्र पाहता व बदललेली समीकरण लक्षात घेता विधानसभा निवडणुकीत पोलादपूर मधून शिंदे शिवसेना यांना 5 हजार पेक्षा जास्त मताधिक्य मिळाले होते.

Raigad ZP Election
Mahalaxmi Express accident : महालक्ष्मी एक्स्प्रेसच्या टॉयलेटमध्ये अडकला चिमुकल्याचा पाय

7 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मतदान दिनी पुरुष मतदार 19 हजार 485, स्त्री मतदार 19 हजार 757 असे एकूण 39 हजार 242 मतदार 67 बुथ मतदान केंद्र वर मतदानाचा हक्क बजावत सहा सदस्य निवडून देणार आहेत.

गेले काही दिवस मतदारांनी उमेदवार व त्याच्या प्रचारासाठी येणाऱ्या नेते मंडळीतर्फे आरोप प्रत्यारोप मनोरंजनात्मक सभांचा आस्वाद घेत मतदान दिनी कोणाच्या पारड्यात मताचे दान टाकणार की बाहेरील उमेदवाराला कोणता घाट दाखविणार हे 9 रोजीच्या मतमोजणी दिनी दिसुन येणार आहे.

रोजगाऱ्याच्या संघी नसल्याने गावातील वाडीवस्ती वरील अनेक मतदार मुंबई-पुणे-ठाणे नालासोपारा, विरार घाटकोपर सुरत पिंपरी चिंचवड आदी ठिकाणी स्थाईक झाले आहेत. मात्र मतदानाचा अधिकार गावात असल्याने त्याच्या मताचे महत्व या निवडणुकीत दिसून येणार आहे.

Raigad ZP Election
Maharashtra ZP Elections : झेडपी, पं. स. निवडणुकीचे उद्या मतदान

समाविष्ट मतदारांची संख्या

पोलादपूर पंचायत समितीच्या नव्याने निर्माण झालेल्या 115 माटवण गणामध्ये 18 मतदान केंद्र असून 4 हजार 956 पुरुष आणि 5 हजार 1 महिला अशी एकूण 9 हजार 957 मतदार संख्या आहे. यासोबतच नव्याने निर्माण झालेल्या 116 कापडे बुद्रुक गणामध्ये 18 मतदान केंद्र असून 5 हजार 316 पुरुष आणि 5 हजार 174 महिला अशी एकूण 10 हजार 490 मतदार संख्या आहे. या दोन्ही पंचायत समिती गणांच्या मतदार संख्येच्या बेरजे एवढी नव्याने 58 कापडे बुद्रुक जिल्हा परिषद गटाची मतदार संख्या 20 हजार 447 झाली आहे. यामध्ये 36 मतदान केंद्रातील 10 हजार 272 पुरुष आणि 10 हजार 175 महिला मतदारांची संख्या समाविष्ट आहे.

पोलादपूर तालुक्यातील 59 लोहारे जिल्हा परिषद गटाची मतदार संख्या पुरुष 9 हजार 213 आणि 9 हजार 528 अशी 31 मतदान केंद्रामधून एकूण 18 हजार 795 एवढी आहे. नव्याने निर्माण झालेल्या 118 कोतवाल बुद्रुक या पंचायत समिती गणातील एकूण 19 मतदान केंद्रांतील 5 हजार 64 पुरुष आणि 5 हजार 405 महिला मतदार समावेश असलेली आहे. ही संख्या 10 हजार 669 एवढी आहे. 117 लोहारे पंचायत समिती गणामध्ये 12 मतदान केंद्र असून 4 हजार 149 पुरुष आणि 4 हजार 177 महिला मतदार एकूण 8 हजार 326 मतदार संख्या आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news