Mumbai Pune Expressway Traffic Update Pudhari
रायगड

Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर प्रवास टाळा, 16 तासांनंतरही मुंबई लेनवरील वाहतूक ठप्प; पर्यायी मार्ग काय?

Mumbai Pune Expressway Todays Traffic Update: बुधवारी सकाळपर्यंत या मार्गिकेवरील वाहतूक सुरू झालेली नसून प्रवाशांनी आज एक्स्प्रेस वेवरुन प्रवास करु नये

पुढारी वृत्तसेवा

Mumbai Pune Expressway Traffic Update News

खालापूर, खोपोली : मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर मुंबईकडे जाणारी मार्गिका तब्बल 16 तासांपासून बंद आहे. बुधवारी सकाळपर्यंत या मार्गिकेवरील वाहतूक सुरू झालेली नसून प्रवाशांनी आज एक्स्प्रेस वेवरुन प्रवास करु नये, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे. पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग आणि पुणे-मुंबई जुना महामार्ग या दोन्ही मार्गावर 20 ते 22 किलोमीटर वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत.

एक्स्प्रेस वे का बंद आहे?

आडोशी बोगद्याजवळ अत्यंत ज्वलनशील प्रॉपिलिन गॅस वाहतूक करणारा टैंकर पलटी झाल्याची घटना ३ फेब्रुवारी मंगळवारी सायंकाळी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास घडली, या अपघातानंतर टँकरमधून गॅस गळती सुरू झाल्याने सुरक्षिततेच्या कारणास्तव मुंबई जाणारी वाहतूक पूर्णतः थांबविण्यात आली आहे.

एक्स्प्रेस वेवरून टँकर पुण्याहून मुंबईच्या दिशेने जात होता. आडोशी बोगद्याजवळील एका तीव्र वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बोगद्याच्या प्रवेश द्वाराजवळच टँकर पलटी होऊन मोठा अपघात झाला. त्यानंतर त्यामधून गॅस गळतीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या दुर्घटनेत टँकरचालक जखमी झाला आहे.

टँकरमध्ये प्रपिलिन

हा अत्यंत ज्वलनशील व स्फोटक गॅस असल्याची माहिती मिळाल्यानंतर प्रशासनाने तातडीने खबरदारीचे उपाययोजना सुरू केल्या. बोका लक्षात घेऊन मुंबईकडे जाणारी वाहतूक तात्काळ रोखण्यात आली असून पुण्याकडील वाहतूकही नियंत्रित करण्यात आली आहे.

अपघाताची माहिती मिळताच बोरघाट पोलीस, आयआरबी महामार्ग पोलीस, देवदूत यंत्रणा तसेच हेल्प फाऊंडेशनची आपत्कालीन पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. खोपोली येथील अग्निशमन दलाचे जवानही घटनास्थळी पोहोचले, गॅस गळतीवर नियंत्रण मिळविण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सकाळी आठपर्यंत सुरू होते. गॅस गळती रोखण्यासाठी विशेष पथकाला पाचारण करण्यात आले आहे. वाहतूक पूर्ववत करण्यासाठी आणखी किती वेळ लागेल हे अद्याप समजू शकलेले नाही.

वाहनांच्या रांगा

एक्स्प्रेस वेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. प्रवासी व वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले त्यानुसार पर्यायी मागनि वाहतूक सुरु करण्यात आली.

पर्यायी मार्ग काय? mumbai pune expressway alternative route

बोरघाट टॅब हद्दीत मुंबई लेन येथे गॅस टँकर पलटी झाल्यामुळे वाहतूक ठप्प झाल्याने मुंबई पुणे आणि पुणे मुंबई येथे बुधवारी ट्रॅफिक राहिल. प्रवाशांनी खालील पर्यायी मार्गांचा वापर करावा.

1.चांदणी चौक ते ताम्हिणी घाट रायगड मार्गे मुंबई

2.आळे फाटा माळशेज घाट ठाणे मार्गे मुंबई

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT