Missing link Selfie fine Pudhari
रायगड

Missing link Selfie fine: मिसिंग लिंकवर थांबून फोटो काढणे पडले महागात; 30 वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई

रविवारी येथे 30 वाहनावर कारवाई केली आहे.

पुढारी वृत्तसेवा

दिलीप पवार

खोपोली शहर: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील नव्याने चालू केलेल्या मिसिंग लिंक ब्रिजवर थांबून फोटो आणि व्हिडीओ काढणाऱ्या वाहन चालकांवर बोरघाट महामार्ग पोलिसांनी कारवाई करत दंडात्मक कारवाई केली. रविवारी येथे 30 वाहनावर कारवाई केली आहे.

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर नव्याने तयार केलेल्या मिसिंग लिंक या केबल स्टॅन्ड पुलावर पर्यटक आणि वाहन चालकांना फोटो काढण्याचा मोह आवरत नाही. दोन तीन दिवसांपासून या ब्रिजवर चालक वाहन थांबवून फोटो व व्हिडीओ काढत असल्याने येथे अपघात होण्याची शक्यता जास्त आहे. याची दखल महामार्ग पोलिसांनी घेतली असून त्यांनी येथे थांबणाऱ्या वाहन चालकांवर थेट दंडात्मक कारवाई केली.

मिसिंग लिंकवर वाहन चालकांनी कुठेही थांबू नये असे सूचनाफलक जागोजागी लावले आहेत परंतु नव्याने सुरू झालेल्या या प्रकल्पाचे फोटो आणि व्हिडिओ काढण्याचा मोह वाहन चालकांना आवरत नसल्याने अनेक वाहनचालक मिसिंग लिंकवरील केबल पूल या ठिकाणी उभे राहून फोटो काढत आहेत अशा वाहन चालकावर महामार्ग पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.

एक्सप्रेसवेने घेतला मोकळा श्वास

सलग सुट्ट्या आणि सणासुदीचे दिवस असले की बोरघाट जाम हे ठरलेलेच असे. त्यात अपघात घडला तर दिवसभर नव्हे तर 34 तास वाहनांना बोरघाटात अडकून पडावे लागत असे. 1 मे शुक्रवारी उद्घाटना दिवशी 24 किमी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. मात्र मिसिंग लिंक सुरू झाल्याने या उलट चित्र बोरघाटात होते.

बोरघाट शनिवार आणि रविवार सुना सुना पडल्याने महामार्ग वाहतूक बोरघाट केंद्रातील पोलिस कर्मचाऱ्यांना झाडाखाली शांत बसून रिकामा बोरघाट पाहावा लागला. मुंबई तसेच पुणेहून मुंबईच्या दिशेने जाणारी वाहने व बसेस मिसिंग लिंक मार्गे गेल्याने बोरघाट वाहतूक कोंडी मुक्त होता. अमृतांजन पुल ते आडोशी बोगदा खोपोली बायपास या मार्गात सुट्यांमध्ये 5 ते 6 किमी वाहनांच्या रांगा असायच्या. त्याच क्षेत्रात तुरळक वाहनांची वर्दळ होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT