Mumbai municipal corporation hall: दोन वर्षांत महापालिका उभारणार नवे सभागृह!

क्रीडा भवनच्या संकल्पचित्र व खर्चाचे अंदाजपत्रक तयार करण्याचे काम सुरू
Mumbai municipal corporation hall
Mumbai municipal corporation hallPudhari
Published on
Updated on

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या सध्याच्या ब्रिटिशकालीन सभागृहातील अपुरी जागा लक्षात घेऊन मुंबई महापालिकेने येत्या दोन वर्षांत नवे महापालिका सभागृह उभारण्याचा निर्णय घेतला आहे. आझाद मैदानलगतच्या क्रीडा भवनच्या जागेवर हे सभागृह उभारले जाणार असून त्याचे संकल्पचित्र व खर्चाचे अंदाजपत्र लवकरात तयार करण्यात येणार आहे.

क्रीडा भवनच्या जागी टाऊन हॉल उभारण्यात येणार होता. तसा प्रस्तावही तयार करण्यात आला होता. मात्र पालिकेतील सत्ताधारी भाजपा शिवसेनेने तो प्रस्ताव फेटाळून लावत क्रीडा भवनच्या जागी महापालिकेचे सुसज्ज सभागृहासह क्रीडा भवन उभारण्याची मागणी लावून धरली. त्यामुळे अर्थसंकल्पीय भाषणात सभागृह नेते गणेश खणकर यांनी येत्या दोन वर्षांत नवे महापालिका सभागृह उभारण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे.

Mumbai municipal corporation hall
Mumbai Road Potholes: पावसाळ्यापूर्वी महामार्ग खड्डेमुक्त; स्थायी समितीत 164 कोटींचा प्रस्ताव

क्रीडा भवनच्या जागेत सभागृहासह क्रीडा भवन उभारता येईल की नाही, जागा पुरेशी आहे का, याचा अभ्यास करून संकल्पचित्र व खर्चाचे अंदाजपत्रक तयार करण्यात येणार आहे. त्यानंतर निविदा प्रक्रिया राबवून सभागृह उभारण्यासाठी कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात येणार आहे.

या सभागृहामध्ये नगरसेवकांसाठी 300 ते 350 आसन व्यवस्था ठेवण्यात येणार आहे. त्याशिवाय अधिकारी, पत्रकार, यांच्यासाठीही पुरेशी जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्याशिवाय महापौर, उपमहापौर दालन, उपाहारगृह, नगरसेवकांसाठी वेटिंग रूम, शौचालय, व अन्य सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

याबाबतचा आराखडा तयार झाल्यानंतर तो आराखडा मुंबई महानगरपालिका सभागृहात नगरसेवकांच्या माहितीसाठी सादर करण्यात येणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

क्रीडाभवनासाठीही पुरेशी जागा उपलब्ध करणार

सध्याच्या क्रीडा भवनामध्ये जेवढी जागा आहे. तेवढीच जागा क्रीडा भवनसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे. याचा आराखडाही तयार करण्यात येणार आहे. आराखडा कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन तयार करण्यात येईल, असेही एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

Mumbai municipal corporation hall
Byculla zoo: राणीबागेत ना सिंह आला ना बंगालचा वाघ! पर्यटकांची संख्या रोडावली

पार्किंगसाठी दोन तळघर

पालिका सभागृहाच्या बैठकीला उपस्थित राहणाऱ्या नगरसेवकांसाठी सभागृहाच्या खाली दोन तळघरे उभारण्यात येणार असून येथे पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे. जेणेकरून सध्याचा भेडसावणारा पार्किंगचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news