अंकुश मोरे
खालापूर- मुंबई–पुणे एक्सप्रेस वेवरील बहुचर्चित कनेक्टिंग लिंक अर्थात मिसिंग लिंक १ मे २०२६ रोजी सुरू झाल्यानंतर, पहिल्यांदाच महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आणि मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर खालापूर टोलनाक्याजवळ पुन्हा एकदा वाहतूक कोंडीचा अनुभव घेत आहे.
गेल्या काही काळात वाहतूक कोंडीच्या प्रसंगांसाठी परिचित असलेल्या या महामार्गाला मिसिंग लिंक सुरू झाल्यानंतर दिलासा मिळाला होता. मात्र गणेशोत्सवाच्या निमित्ताने पुणे मार्गावर वाढलेली वाहनांची गर्दी, त्यातच पाली मार्गे कोकणात जाणाऱ्या भाविक भक्तांचे संख्या पाहता आज पुन्हा एकदा पुण्याच्या दिशेने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले.
मिसिंग लिंक सुरू झाल्यानंतरचा हा पहिलाच मोठा गणेशोत्सवी वाहतूक अनुभव असल्याने, महामार्गावरील कोंडी विशेष चर्चेचा विषय ठरेल. महामार्ग वाहतूक पोलीस यंत्रणा बोरघाट आणि पळस्पे, आय आर बी पेट्रोलिंग आणि वाहतूक व्यवस्थापन यंत्रणा वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी प्रयत्नाची पराकष्टा करत आहे.
वाहनांची वाढती संख्या आणि सणासुदीच्या काळातील महामार्गावरील आव्हाने यांची पुन्हा एकदा जाणीव करून देणारा हा प्रसंग ठरला आहे असे म्हणण्यासारखं नाही.