Kalyan Doctor Assault: डॉक्टरला मारहाण करणाऱ्या हल्लेखोराला १७ दिवसानंतर अटक

विनीत जयवंत देशमुख (३०, रा. कल्याण-पूर्व) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
Arrested
ArrestedPudhari
Published on
Updated on

डोंबिवली: कल्याण पूर्वेतील भानुज्योत हॉस्पिटलमधील अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. योगेंद्र जैस्वाल यांना मारहाण करून फरार झालेल्या हल्लेखोराला अखेर १७ दिवसांनंतर कोळसेवाडी पोलिसांनी उल्हासनगरातून अटक केली आहे. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात संताप व्यक्त होत असून आरोपीवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, कल्याण पूर्वेतील भानुज्योत हॉस्पिटलमध्ये अस्थिरोग तज्ज्ञ म्हणून कार्यरत असलेले डॉ. योगेंद्र जैस्वाल (वय ४१) यांच्यावर त्यांच्याच रुग्णाच्या मुलाने किरकोळ कारणावरून हल्ला केला होता. विनीत जयवंत देशमुख (३०, रा. कल्याण-पूर्व) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

Arrested
Ganeshotsav: गणपतीसाठी कोकणला निघताय? प्रवास सुरू करण्यापूर्वी ‘हे’ ॲप डाउनलोड करा; अपघाताचा धोका टाळण्यास होईल मदत

२२ ऑगस्ट रोजी शनिवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास ही घटना घडली होती. विनीतचे वडील जयवंत देशमुख हे डॉ. जैस्वाल यांच्याकडे उपचार घेत आहेत. औषध गोळ्या संपल्याने आणि डॉक्टरांनी तपासणीची वेळ दिल्याने रुग्ण जयवंत हे त्यांचा मुलगा विनीत याच्यासह रात्री साडेदहा वाजण्याच्या दरम्यान हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांच्या भेटीसाठी आले होते.

डॉक्टरांनी जयवंत यांची तपासणी करून त्यांना औषध गोळ्या लिहून दिल्या आणि त्या कशा घ्यायच्या हे समजावून सांगत असताना विनीतने मध्येच हस्तक्षेप केला. त्याने डॉक्टरांचा एकेरी शब्दात उल्लेख करून त्यांच्याशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली.

डॉ. जैस्वाल यांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला असता विनीत आक्रमक झाला आणि त्याने डॉक्टरांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. डॉक्टरांनी त्याला केबिनबाहेर जाण्यास सांगितले. त्यावेळी वडील जयवंत यांनी विनीतला समजावून डॉक्टरांच्या कक्षाबाहेर नेले.

ते दोघे गेले असे समजून डॉक्टरांनी दुसऱ्या रुग्णाला केबिनमध्ये पाठविण्याची सूचना सहकाऱ्याला केली. मात्र त्याचवेळी बाहेर गेलेला विनीत रागाच्या भरात पुन्हा डॉ. जैस्वाल यांच्या केबिनमध्ये घुसला आणि काही कळण्याच्या आत त्याने शिवीगाळ करत डॉक्टरांना बेदम मारहाण केली.

Arrested
Pune Ganesh Visarjan: गणेश विसर्जनासाठी पुणे महापालिका सज्ज; १५ घाटांवर २४ तास सुरक्षा

केबिनमधून मारण्याचा आवाज आल्याने इतर रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक धावत केबिनमध्ये आले आणि त्यांनी डॉक्टरांची विनीतच्या तावडीतून सुटका केली. त्यानंतर हॉस्पिटलमधील कर्मचारीही तेथे आले. मारहाणीचा हा संपूर्ण प्रकार डॉक्टरांच्या केबिनमध्ये लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

या प्रकरणी डॉ. योगेंद्र जैस्वाल यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कोळसेवाडी पोलिसांनी हल्लेखोर विनीत देशमुख याच्याविरूद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाला होता.

गुन्हा दाखल झाल्यापासून हल्लेखोर विनीत याला पोलिस जंग जंग पछाडत होते. त्याचा ठाव ठिकाणास सापडत नव्हता. अखेर पोलिसांना यश आले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन पगार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने शोध घेत अखेर १७ दिवसांनंतर त्याला उल्हासनगर येथून अटक केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news