Mumbai Pune Expressway Accident Pudhari
रायगड

Mumbai Pune Expressway Accident: बोरघाटात कंटेनरचा ब्रेक फेल, 25- 30 वाहनांना धडक; 30 प्रवासी जखमी

Raigad Borghat Accident Update: जखमींना खोपोलीतीन नगरपालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पुढारी वृत्तसेवा

Mumbai Pune Expressway Accident

प्रशांत गोपाळे

रायगड : मुंबई- पुणे एक्सप्रेस वेवर बोरघाटात शनिवारी दुपारी भीषण अपघात झाला. ब्रेक फेल झालेल्या कंटेनरने वाहनांना धडक दिली. या भीषण अपघातात 25 ते 30 वाहने एकमेकांवर आदळली असून 30 ते 35 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना खोपोलीतीन नगरपालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

शनिवारी दुपारी मुंबई- द्रुतगती मार्गावर अपघात झाला. ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. जखमींपैकी 20 ते 22 जणांना पुढील उपचारासाठी पाठविण्यासाठी परिसरातील ग्रामपंचायतमधील रुग्णवाहिका मागविण्यात आल्या आहेत. या अपघातात वाहनांचे नुकसान झाल्याचे समजते. पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या मार्गिकेवर हा अपघात झाला आहे. या अपघातात एका महिला प्रवाशाचा मृत्यू झाल्याचे समजते. मात्र, पोलिसांकडून या वृत्ताला दुजोरा मिळू शकलेला नाही.

दरम्यान, मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवर जानेवारी 2021 ते जून 2025 या कालावधीत तब्बल 500 हून अधिक अपघात झाले आहेत. या अपघातांमध्ये 300 हून अधिक प्रवाशांना जीव गमवावा लागला आहे. अपघात रोखण्यासाठी प्रशासनाकडून वेगवेगळ्या उपाययोजना राबवल्या जात आहेत. मात्र, शनिवारी झालेल्या कंटेनर अपघाताने घाटातील अवजड वाहनांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT