Mumbai Goa highway protest Pudhari
रायगड

Mumbai Goa highway protest: महामार्ग प्रशासनाविरोधात आंबेवाडीनाक्यावर साखळी उपोषण

अंडरपास, सर्व्हिस रोडसह मूलभूत मागण्या प्रलंबित; मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच

पुढारी वृत्तसेवा

कोलाड : मुंबई-गोवा महामार्ग आंबेवाडी कोलाड वरसगांव येथिल उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूला 200 मि. अंतरावर अंडरपास बोगदे देण्यात यावे, सर्विस रोडचे काम आजपर्यंत पुर्ण झाले नाही ते काम पूर्ण करून देणे,गटारावरील झाकणे बसवून देणे, अशा विविध मागण्यासाठी आंबेवाडी बाजारपेठेतील

द.ग.तटकरे चौकात आंबेवाडी कोलाड वरसगाव पंचक्रोशीतील सर्व जागरूक नागरिक यांनी साखळी उपोषण सुरु केले असुन जो पर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तो पर्यंत हे उपोषण सुरुच राहणार असल्याचे सांगण्यात आलेे.

कोलाड येथे येजा करण्यासाठी अंडरपास रस्ता नसल्यामुळे येथे येणाऱ्या नागरिकांना एक किलोमीटर अंतरावर पुढे जाऊन वलसा घालावे लागत असल्यामुळे येथील नागरिकांना त्रास सहन करावा लागत असुन येथे दोन अंडरपास रस्ता व्हावा यासाठी आम्ही साखळी उपोषण करीत आहोत.
सुरेशदादा महाबळे, माजी सरपंच, आंबेवाडी
अंडरपास रस्ता नसल्याने येथील नागरिक,व्यापारी वर्ग,रिक्षा,मिनिडोअर,टेम्पो चालक याच्या अडचणी वाढत आहेत.या मतदार संघातील रोहा सुधागडचे आमदार रवीशेठ पाटील यांना आम्ही निवडून दिले परंतु ते निवडून आल्यानंतर या मतदार संघात फिरकले नाही.जर त्यांनी अंडरपास रस्ता करून दिला तर मी अनवानी चालत जाऊन त्याच्या घरी जाऊन त्यांचा सत्कार करीन
विश्वास बागुल, कुणबी समाज युवानेता

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT