Mumbai Goa Highway Accident pudhari
रायगड

Mumbai Goa Highway Accident: मुंबई-गोवा महामार्गावर इर्टिगा कारचा भीषण अपघात; एक ठार, दोन गंभीर जखमी

केंबुर्ली गावाच्या हद्दीत इर्टिगा कारचा भीषण अपघात होऊन कारमधील एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला

Anirudha Sankpal

महाड प्रतिनिधी

Mumbai Goa Highway Accident: मुंबई-गोवा महामार्गावर महाड तालुक्यातील केंबुर्ली गावाच्या हद्दीत इर्टिगा कारचा भीषण अपघात होऊन कारमधील एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला, तर रस्त्यावर काम करणारे दोन कामगार गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात बुधवारी घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, कोकणातून मुंबईच्या दिशेने इर्टिगा कार प्रवास करत होती. केंबुर्ली गावाच्या हद्दीत आल्यानंतर चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार अनियंत्रित होऊन महामार्गाच्या बाजूला असलेल्या शेतात जाऊन आदळली. या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

अपघातात कारमधील एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला. तसेच महामार्गावर काम करणारे दोन कामगार या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने महाड येथील ट्रॉमा केअर युनिटमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

अपघाताची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला होता. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT