Mumbai Goa Highway Accident: मुंबई-गोवा महामार्गावर हातिवलेनजीक टेम्पो-ट्रॅक्टरचा अपघात

हातिवलेनजीक सात ते आठ प्रवासी जखमी; सुदैवाने जीवितहानी टळली
Mumbai Goa Highway Accident
Mumbai Goa Highway Hativale Accidentfile photo
Published on
Updated on

Mumbai Goa Highway Accident

राजापूर : मुंबई-गोवा महामार्गावर हातिवलेनजीक हॉटेल शिवानंदसमोर रविवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास मुंबईहून सिंधुदुर्गच्या दिशेने जाणाऱ्या टेम्पोला ट्रॅक्टरने धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात टेम्पोमधील सात ते आठ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून सिंधुदुर्गच्या दिशेने निघालेला टेम्पो हातिवलेनजीक हॉटेल शिवानंदसमोर महामार्गावर आला असता समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरने त्याला धडक दिली. धडक जोरदार असल्याने टेम्पोच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले.

Mumbai Goa Highway Accident
Mumbai Goa Highway: गणपतीसाठी गावी निघाले, पण वाटेतच मृत्यूने गाठले; मुंबई-गोवा महामार्गावर ३० फूट खोल खड्ड्यात दुचाकी कोसळली

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक तसेच महामार्ग पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमी प्रवाशांना तातडीने राजापूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून अपघाताची माहिती घेतली.

दरम्यान, मुंबई-गोवा महामार्गावर टेम्पोचालक अथवा वाहनावरील नियंत्रणासंदर्भात अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Mumbai Goa Highway Accident
Mumbai Goa National Highway : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील धोकादायक परिस्थिती कायम

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news