Solapur Accident : अपघातात मुलाचा मृत्यू, वडील जखमी

उपचारासाठी जाताना सावळेश्वरजवळ दुचाकीला कंटेनरची धडक
Accident
AccidentPudhari
Published on: 
Updated on: 

मोहोळ : सोलापूरकडे रुग्णालयात उपचारासाठी निघालेल्या वडील व मुलाच्या दुचाकीला कंटेनरने पाठीमागून धडक दिल्याने दुचाकीस्वार प्रशांत हरी टेकाळे (वय २७, रा. सावळेश्वर) याचा जागीच मृत्यू झाला. वडील हरी टेकाळे जखमी झाले. मंगळवारी सकाळी दहा वाजून ४० मिनिटांदरम्यान हा अपघात झाला.

सावळेश्वर येथील हरी टेकाळे व मुलगा प्रशांत हे सोलापूर येथे उपचारासाठी निघाले होते. सावळेश्वर येथील पुलावर भरधाव कंटेनरने (टी. एस. ०८, यु. बी. ४२४४ त्यांच्या दुचाकीस (एम. एच. १३, बी. एम. ४१९९) धडक दिली. त्यामध्ये हरी टेकाळे हे रस्त्याच्या बाजूला पडले. तर प्रशांत हे कंटेनरच्या पुढच्या चाकाखाली अडकल्याने ते सुमारे २५ फूट फरफटत गेले. यात डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी कंटेनर चालक महादेव बाबुराव (रा. हुनसगेरा, ता. हुमनाबाद, जि. बीदर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान, महामार्गावरून निघालेले पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी जखमीला उपचारासाठी सोलापूरला पाठविले. मोहोळ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दीपक पाटील यांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेतली. अधिक तपास हेडकॉन्स्टेबल अतुल क्षीरसागर करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news