खाडीपट्टा : रघुनाथ भागवत
खाडीपट्टयात ज्या ठिकाणी उभे पीक आणि कोरडी जमीन आहे त्या ठिकाणी भात कापणी करण्यासाठी यांत्रिक पद्धतीने रिपर मशीन यांसारख्या यंत्रांचा वापर केला जात आहे. निसर्गाच्या अवकृपेने शेतकऱ्यांचे भरमसाठ नुकसान झाले असून उरलासुरला पीक पदरात पाडून घेण्याची लगबग सद्या पाहायला मिळत असून काही ठिकाणी अजूनही कित्येक शेतात चिखल आहे. त्यामुळे शेतकरी राजा पुरता हतबल झाला आहे.
कापणीचा हंगाम लांबल्यामुळे कडधान्याच्या शेतीला देखील उशीर होणार असल्याचे सांगण्यात येत असून हवामानाचा फटका यावर्षी बसला असून पीक पूर्णपणे हातातून जात नसले तरी, उरलेल्या पिकाला व्यवस्थित पदरात पाडून घेण्याची शेतकऱ्यांची धडपड पाहायला मिळत आहे.
ज्या शेतात कापणी होत असलेले पीक त्याच ठिकाणी वाळविण्यासाठी सोडले जायचे, मात्र तेथील शेतीत अजूनही चिखल असल्याने कापणी केलेले पीक रस्त्यालगत वाळविले जात आहे. रिपर यंत्र भात पीक कापणीसाठी काम करते ज्यामुळे वेळ आणि श्रम वाचतात.
लहान शेतांमध्ये रिपर मशीनचा वापर करता येतो, जे पीक कापून एका ओळीत ठेवते. यांत्रिक कापणीसाठी शेत सपाट असणे आणि पिकांची लागवड एका ओळीत असणे आवश्यक असल्याचे ज्या शेतकऱ्यांनी या यंत्राचा वापर त्यांनी सांगितले.
यांत्रिकी यंत्र रिपर मशीनमुळे भात पीक कापणी झटपट होते ज्यामुळे वेळेची बचत आणि मजुरीच्या खर्चावर वाचतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी या यंत्राच्या अनुशंगाने असलेल्या भात शेतीमध्ये जास्तीत जास्त त्याचा वापर करावा.गणपत मालप, शेतकरी, चिंभावे
यांत्रिक कापणी पारंपरिक पद्धतींपेक्षा खूप जलद
रिपर यंत्र हे एक परवडणारे यंत्र आहे. जे भात कापणीची प्रक्रिया करते. शेतांसाठी हे खूप कार्यक्षम असून हे एक लहान यंत्र असून जे भात कापून एका ओळीत ठेवते. हे विशेषतः लहान शेतांसाठी आणि एका ओळीत केलेल्या लागवडीसाठी उपयुक्त आहे.
यांत्रिकी कापणीसाठी आवश्यक असलेल्या गोष्टीमध्ये शेत सपाट असणे आवश्यक आहे जेणेकरून यंत्र सहजतेने त्यामधून फिरू शकेल. तसेच पिकांची लागवड एका ओळीत असल्यास यंत्राचा वेग वाढतो आणि कापणी करणे सोपे होते.
पीक काढणीवेळी उभे आणि एकसमान उंचीचे असावे ज्यामुळे आपल्याला त्याचा फायदा होतो. यांत्रिक कापणी पारंपरिक पद्धतींपेक्षा खूप जलद होते. मजुरीचा खर्च कमी होतो त्यामुळे श्रमाची बचत होते. योग्य साधनांचा वापर केल्यास धान्याचे नुकसान देखील कमी होते.