Mahad Municipal Council: महाड नगराध्यक्ष पदासाठी 8 तर नगरसेवक पदासाठी 74 जणांनी नाम निर्देशक पत्र केले दाखल!

महाड नगर परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच नगरसेवक पदासाठी मोठ्या प्रमाणात दाखल नामनिर्देशन पत्र
Mahad Municipal Council
महाड नगराध्यक्ष पदासाठी 8 तर नगरसेवक पदासाठी 74 जणांनी नाम निर्देशक पत्र केले दाखल!Pudhari Photo
Published on
Updated on

महाड: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पहिल्या टप्प्यातील रायगड जिल्ह्यातील महाड नगर परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी 8 तर नगरसेवक पदासाठी 74 उमेदवारांनी आपली नामनिर्देशन पत्र दाखल केल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा महाडचे तहसीलदार महेश शितोळे व महाड नगर परिषदेचे मुख्य अधिकारी धनंजय कोळेकर यांनी दिली.

मात्र महाड नगर परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच नगरसेवक पदासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात नामनिर्देशन पत्र दाखल केले गेले आहेतप स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पहिल्या टप्प्यातील न. प.ंच्या नगराध्यक्ष पदाच्या व नगरसेवक पदाच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजचा शेवटचा दिवस होता महाड नगर परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर नगरसेवक पदासाठी 74 नामनिर्देशन पत्र दाखल झाली आहेत तर. नगराध्यक्ष पदासाठी 8 जणांनी आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले आहेत.

महाड न. प.च्या नगराध्यक्ष पदासाठी नामनिर्देशन पत्र दाखल केलेल्या उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे; चेतन उर्फ बंटी गजानन पोटफोडे(शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष), सुदेश शंकर कलमकर (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट), सुनील वसंत कविस्कर यांचे दोन उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत (शिवसेना शिंदे गट), गणेश सुरेश कारंजकर (अपक्ष), अनिकेत अनिल कविस्कर( शिवसेना शिंदे गट), पराग पद्माकर वडके (अपक्ष), संकेत दीपक वारंगे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट) तर महाड नगर परिषदेच्या 10 प्रभागातील20. जागांकरिता74. उमेदवारांनी आपली नाम निर्देशन पत्र दाखल केली आहेत.

Mahad Municipal Council
Gutkha ban violation: गुटखा बंदीला छेद; श्रीवर्धनात बेकायदेशीर विक्री सुरू

महाड नगर परिषदेच्या नगरसेवक पदासाठी कोणत्या पक्षाकडून किती उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत त्यांची आकडेवारी पुढीलप्रमाणे;शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष :1, भारतीय जनता पक्ष; 5, शिवसेना शिंदे गट ; 27, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट : 31, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष :06, प्रहार जनशक्ती पक्ष ; 02, अपक्ष ; 01, अशी एकूण 74 जणांनी आपली नामनिर्देशन पत्र दाखल केले. महाड नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी होणारी निवडणूक ही अटीतटीची होण्याची शक्यता राजकीय निरीक्षकांकडून व्यक्त केली जात आहे.

Mahad Municipal Council
Raigad News: मांडवा जेट्टी ते अलिबाग मार्गावर दररोज अवजड वाहतूकीला बंदी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news